Advertisement

क्यूएस रँकिंगमध्ये देशात आयआयटी मुंबई अव्वल

जागतिक क्रमवारीत विषयनिहाय श्रेणीमध्ये पहिल्या ५० मध्ये स्थान मिळविण्यात देशात केवळ आयआयटी मुंबई (४४) आणि आयआयटी दिल्ली (४७) या शैक्षणिक संस्था यशस्वी होऊ शकल्या आहेत.

क्यूएस रँकिंगमध्ये देशात आयआयटी मुंबई अव्वल
SHARES

२०२० सालची द क्यूएस वर्ल्ड इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची युनिव्हर्सिटी रँकिंग (The QS World Engineering and Technology University Ranking) नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये आयआयटी मुंबईने (iit bombay) जागतिक क्रमवारीत ४४ व्या स्थानावर झेप घेतली आहे. २०१९ मध्ये आयआयटी मुंबई ५३ व्या स्थानी होती. आयआयटी दिल्ली आणि आयआयटी खरगपूरनेही क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये स्थान मिळवलं आहे. 

जागतिक क्रमवारीत विषयनिहाय श्रेणीमध्ये पहिल्या ५० मध्ये स्थान मिळविण्यात देशात केवळ आयआयटी मुंबई (४४) आणि आयआयटी दिल्ली (४७) या शैक्षणिक संस्था यशस्वी होऊ शकल्या आहेत. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीने जाहीर केलेली रँकिंग ही अधिकृत आणि प्रतिष्ठित मानली जाणारी संस्था आहे. क्यूएसच्या या यादीत ८५ देशांमधील जगातील अव्वल १ हजार इन्स्टिट्यूट आहेत.  ग्लोबली मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी ही संस्था गेली अनेक वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे.

आयआयटी मुंबईचा १०० पैकी ४९.५ स्कोर आहे. शैक्षणिक दर्जासाठी ५४.२, आयआयटी बॉम्बेतून प्राप्त होणाऱ्या रोजगार दर्जासाठी ७१.२, तेथे शिकविणाऱ्या फॅकल्टीसाठी ३.४, विदेशी विद्यार्थ्यांसाठी १.६ असे विविध प्रकारचे गुण आयआयटी मुंबईला क्यूएसकडून देण्यात आले आहेत.



हेही वाचा  -

राज्यात १३८ विशेष जलदगती न्यायालये होणार

महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा, अॅडमीशनसाठी लागल्या रांगा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा