Advertisement

JEE Main 2021: JEE परीक्षा देता येणार मातृभाषेत

Joint Admission Board (JAB) तर्फे IIT मधल्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर JEE ही परीक्षा घेण्यात येते.

JEE Main 2021: JEE परीक्षा देता येणार मातृभाषेत
SHARES

JEE Main ही प्रवेश परीक्षा यापुढे प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा घेतली जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) यांनी केली आहे. Joint Admission Board (JAB) तर्फे IIT मधल्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर JEE ही परीक्षा घेण्यात येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यानुसारच हा निर्णय असल्याचं पोखरियाल यांनी जाहीर केलं.

पोखरियाल यांनी यासंबंधि ट्वीट करून माहिती दिली आहे. देशातल्या २२ प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यायचं आमचं धोरण आहे. कुठलीही एक भाषा लादायचा यामागे उद्देश नाही. इंग्रजी नको असं आमचं म्हणणं नाही. पण भाषा निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना हवं आणि भाषा ही त्यांच्या ज्ञानसंपादनात किंवा शिक्षणात अडथळा ठरता कामा नये, असा या धोरणामागचा उद्देश असल्याचं पोखरियाल यांनी स्पष्ट केलं.

आयआयटी आणि इतर मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी IIT, JEE ही परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी विद्यार्थी दहावीच्या आधीपासूनच तयारी करत असतात. पण मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतून उत्तरं लिहिणं जास्त सोयीचं असतं.



हेही वाचा

मनपा शाळेतील १५० शिक्षकांना 'कोविड' प्रतिबंध विषयक प्रशिक्षण

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांच्या तारखा जाहीर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा