Advertisement

JEE चा निकाल जाहीर, २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के पर्सेंटाइल

राष्ट्रीय सामाईक (JEE Main) मुख्य परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केला.

JEE चा निकाल जाहीर, २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के पर्सेंटाइल
SHARES

राष्ट्रीय सामाईक (JEE Main) मुख्य परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केला. या परीक्षेत २४ जणांना १०० पर्सेटाइल मिळाले आहेत. या परीक्षेसाठी देशातील ६ लाख ३५ हजार  तर राज्यातील साधारण दीड लाख विद्यार्थी बसले होते. निकाल राष्ट्रीय चाचणी कक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. देशभरात १ ते ६ सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. (jee main exam result declare)

यावर्षी एकूण ११.७४ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेसाठी नोंदणी केली (जानेवारी आणि सप्टेंबर परीक्षा मिळून) होती. त्यापैकी १०.२३ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. देशभरात २३२ शहरांमध्ये एकूण ६६० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यापैकी ८ केंद्रे ही देशाबाहेरची होती.

हेही वाचा - कोरोना झाल्यानं NEET, JEE परीक्षा चुकली? चिंता नको, पुन्हा घेतली जाणार परीक्षा

आयआयटी तसंच देशातील नामांकीत इंजिनीअरिंग काॅलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जेईई मेन ही परीक्षा घेण्यात येते. जेईई मेन परीक्षा २०२० बीई / बीटेक अभ्यासक्रमांसाठी यंदा दोन वेळा संगणक आधारित पद्धतीने झाली. पहिली परीक्षा ७ ते ९ जानेवारी २०२० या कालावधी सहा सत्रात झाली, तर दुसरी परीक्षा २ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत १० सत्रात झाली. दोन्ही स्कोर पाहून सर्वोत्तम स्कोर ध्यानात घेतलेला आहे. विद्यार्थी आणि पालकांना उत्तरतालिका (आन्सर की) आणि निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. 

जेईई मेन २०२० कट ऑफ टोटल पेपर - १ (बीई / बीटेक)

  • प्रवर्ग - कट ऑफ
  • सर्वसाधारण रँक यादी - ९०.३७६५३३५
  • आर्थिक वंचित गट - ७०.२४३५५१८
  • ओबीसी - ७२.८८८७९६९
  • एससी - ५०.१७६०२४५
  • एसटी - ३९.०६९६१०१
  • दिव्यांग - ०.०६१८५२४

हेही वाचा- अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा