Advertisement

'लॉ' च्या परीक्षा ४ डिसेंबरपासून, विद्यार्थ्यांना दिलासा

'लॉ' परीक्षा जुन्या पॅटर्ननुसार घ्यायच्या म्हणजे विद्यापीठ प्रशासनाला संपूर्ण तयारी करावी लागणार आहे. 'लॉ' च्या प्रश्नपत्रिका, परीक्षेची वेळ यांसह संपूर्ण वेळापत्रकातही बदल होणार असल्यानं विद्यापीठ प्रशासनानं या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

'लॉ' च्या परीक्षा ४ डिसेंबरपासून, विद्यार्थ्यांना दिलासा
SHARES

मुंबई विद्यापीठानं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लॉ (विधी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून सुरू केलेल्या ६०:४० या नव्या पॅटर्नला मुंबई उच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी स्थगिती दिली होती. विद्यापीठाच्या या गोंधळाचा फटका विधी शाखेच्या परीक्षांना बसल्यानं विद्यापीठ प्रशासनानं या परीक्षा पुढं ढकलल्या होत्या. दरम्यान  या परीक्षांबाबतचं सुधारित वेळापत्रक विद्यापीठानं वेबसाईटवर जाहीर केल असून येत्या ४ डिसेंबरपासून लॉ च्या परीक्षा घेण्यात येणार आहे. यामुळं 'लॉ' च्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 


उच्च न्यायालयात याचिका

मुंबई विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून विधी अभ्यासक्रमासाठी जुन्या परीक्षा पद्धतीत बदल करून ६०:४० असा नवीन पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या परीक्षा पद्धतीला विरोध करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठाकडून विधी अभ्याक्रमासाठी ६०/४० परीक्षांबाबतचा निर्णय अर्धे शैक्षणिक वर्ष झाल्यानंतर घेण्यात आला. त्यामुळं हा निर्णय २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी हा नियम लागू करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश २९ ऑक्टोबर रोजीच्या सुनावणी दरम्यान विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले. 


१०० गुणांची प्रश्नपत्रिका

'लॉ' परीक्षा जुन्या पॅटर्ननुसार घ्यायच्या म्हणजे विद्यापीठ प्रशासनाला संपूर्ण तयारी करावी लागणार आहे. 'लॉ' च्या प्रश्नपत्रिका, परीक्षेची वेळ यांसह संपूर्ण वेळापत्रकातही बदल होणार असल्यानं विद्यापीठ प्रशासनानं या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी विद्यापीठानं नव्यानं घेण्यात येणाऱ्या परीक्षा जुन्या पद्धतीनुसार म्हणजे १०० गुणांची प्रश्नपत्रिका असणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याशिवाय त्या परिपत्रकात येत्या काही दिवसात लॉ ची परीक्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असं स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आलं होतं. 


परीपत्रक काढलं

अखेर विद्यापीठानं १६ नोव्हेंबर रोजी विद्यापीठानं परीपत्रक काढून येत्या ४ डिसेंबरपासून लॉ च्या परीक्षा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या परीपत्रकानुसार तीन वर्ष लॉ प्रथम एलएलबी सेमिस्टर २, एलएलबी सेमिस्टर ६, तीन वर्ष एलएलबी/ बीएलएस पाच वर्ष, पाच वर्ष एलएलबी या विषयांची परीक्षा येत्या ४ डिसेंबर रोजी होणार आहेत. द्वितीय वर्ष एलएलबी, एलएलबी सेमिस्टर ८, एलएलबी/बीएलएस सेमिस्टर २ येत्या ५ डिसेंबर रोजी होणार आहेत. 



हेही वाचा - 

विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावर; ३०० सीसीटिव्ही फक्त कागदावर

बीएमएमच्या परीक्षेत हॉलतिकीट गोंधळ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा