Advertisement

लॉच्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा, एटीकेटी परीक्षा पुढे ढकलल्या


लॉच्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा, एटीकेटी परीक्षा पुढे ढकलल्या
SHARES

'आधी निकाल लावा, मगच परीक्षा देऊ' अशी खंबीर भूमिका घेऊन विद्यापीठाविरोधात दंड थोपटणाऱ्या लॉच्या विद्यार्थ्यांना अखेर न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

या वर्षी ऑनलाईन असेसमेंटमुळे एकूणच निकालांचं बिघडलेलं गणित अद्याप विद्यापीठाला सोडवता आलेलं नाही. त्यातच पूनर्मूल्यांकनाचे निकाल न लावताच विद्यापीठाने विद्यार्थ्यांना एटीकेटी परीक्षा देण्यास बजावल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.


'निकालानंतरच परीक्षा घ्या'

विद्यापीठाचे रखडलेले निकाल आणि विद्यार्थ्यांनी केलेले ठिय्या आंदोलन यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी अॅड. रुई रॉड्रिग्ज यांच्या खंडपीठाने विद्यापीठाला पुढील शुक्रवारपर्यंत पुनर्मूल्यांकनाचे सर्व निकाल लावण्याची वेळ दिली आहे. अर्थात आता येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावणे अपेक्षित आहे. तसेच, निकलानंतरच परीक्षा घेण्याचे आदेश न्यायालयाने विद्यापीठाला दिले आहेत.

काल आम्ही केलेले आंदोलन फळाला आले हे महत्वाचे. जर आम्ही विद्यापीठाला टाळं लावलं नसतं, तर विद्यापीठाला कधीच जाग आली नसती. आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे.

सिद्धार्थ इंगळे, लॉ विद्यार्थी


20 नोव्हेंबरपासून परीक्षा

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सोमवार 20 नोव्हेंबरपासून एटीकेटीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. 'विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रक बघून परीक्षेला यावे', असे आवाहनही विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.



हेही वाचा

विद्यापीठात हे चाललंय तरी काय?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा