Advertisement

मागितली मराठी उत्तरपत्रिका, मिळाली इंग्रजी प्रत


मागितली मराठी उत्तरपत्रिका, मिळाली इंग्रजी प्रत
SHARES

मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा निकाल यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर लागल्यानं सर्वत्र परीक्षा विभागाचं कौतुक होतं आहे. परंतु याच परीक्षा विभागानं परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला त्याचेच गुण दिलेत का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

 एलएलएम अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थ्यानं कमी गुण मिळाल्यानं विद्यापीठाकडं उत्तरपत्रिकेची कॉपी मागितली होती. परंतु त्यानं मराठीत सोडवलेल्या उत्तरपत्रिकेची कॉपी न देता त्याच आसन क्रमांकाची इंग्रजीत सोडवलेली उत्तरपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.




नेमकं प्रकरण काय?

सचिन अडकर या विद्यार्थ्यानं एलएलएम सेमिस्टर १ ही परीक्षा जानेवारी महिन्यात दिली होती. अभ्यासात हुशार असलेल्या सचिनला 'इंडियन कॉन : न्यू चॅलेंजस' या विषयात अगदीच कमी गुण मिळाल्यानं तो अनुत्तीर्ण झाला. अशा पद्घतीचा निकाल लागल्यानं त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यानं धक्क्यातून सावरत आपली उत्तरपत्रिका नेमकी कशी तपासली गेली हे पाहण्यासाठी विद्यापीठातून उत्तरपत्रिकेची कॉपी मागवली.

 विद्यापीठ प्रशासनानं आधुनिक सेवेनुसार त्याला ईमेलद्वारे ही कॉपी पाठवली. मात्र, कॉपी ही त्याची नसल्यानं तो अधिकच गोंधळला. विशेष म्हणजे त्याने  'इंडियन कॉन : न्यू चॅलेंजस'  या विषयाचा पेपर मराठीत लिहिला होता. परंतु त्याला विद्यापीठ प्रशासनानं पाठवलेल्या उत्तरपत्रिकेचा आसन क्रमांक तोच असला तरी उत्तरपत्रिकेची कॉपी इंग्रजीत होती.  त्यानंतर त्याने विद्यापीठ प्रशासनाला सविस्तर पत्रव्यवहार करून जाब विचारला आहे. 



मी एलएलएम सेमिस्टर १ ची परीक्षा जानेवारी महिन्यात दिली होती. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मला सर्व विषयात चांगले गुण मिळाले होते, परंतु एका विषयात अनुउत्तीर्ण झाल्यानं मला फार धक्का बसला. त्यानंतर मी त्या विषयाच्या उत्तरपत्रिकेची कॉपी विद्यापीठाकडे मागवली. परंतु विद्यापीठानं मला माझ्याच आसन क्रमांकाची इंग्रजी उत्तरपत्रिकेची प्रत पाठवली. विशेष म्हणजे मी 'इंडियन कॉन : न्यू चॅलेंजस' विषयाचा पेपर मराठीत लिहिला होता. विद्यापीठानं चुहेही वाचा -कीची उत्तरपत्रिका देऊन परीक्षा विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर मांडला आहे.
- सचिन अडकर, लॉ विद्यार्थी



गेल्यावर्षी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन केल्यामुळं विद्यापीठातील निकालाचा गोंधळ उडाला होता. त्यानंतर विद्यापीठानं ऑनलाईन मूल्यांकनाची प्रक्रिया सक्षम करून यंदाचे निकाल वेळेत लावले. परंतु आता या निकालांमधील दोष समोर येण्यास सुरूवात झाली असून विद्यापीठ प्रशासनानं काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. - शौमित साळुंखे, लॉ विद्यार्थी



विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक चुकीची लिहिल्याची काही प्रकरणं आढळून आली असून कदाचित कोणीतरी चुकून हा क्रमांक लिहिला आहे. त्यामुळं त्याला ही चुकीची उत्तरपत्रिका मिळाली असावी. तसंच या विद्यार्थ्यानं ही उत्तरपत्रिका परीक्षा विभागात जमा करावी व त्याला त्याची योग्य ती उत्तरपत्रिका दिली जाईल
-  विनोद माळाले, जनसंपर्क, उप कुलसचिव, परीक्षा व मूल्यांकन विभाग



हेही वाचा -

तरीही ५० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

परदेशात उच्च शिक्षणासाठी सरकारची शिष्यवृत्ती




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा