Advertisement

परीक्षेच्या १ दिवस आधी आले हॉल तिकीट, लॉच्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट!


परीक्षेच्या १ दिवस आधी आले हॉल तिकीट, लॉच्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट!
SHARES

गेल्या काही दिवसांपासून लॉ शाखेचे रखडेलेले निकाल, वेळापत्रक बदल, विद्यार्थ्यांना गुण देताना शिक्षकांचा मनमानी कारभार यामुळे लॉचे विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यातच आता लॉच्या हॉलतिकीट गोंधळाला सुरूवात झाली आहे. मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) सेमिस्टर १ ची परीक्षा २५ मे २०१८ पासून सुरू होणार आहे, हे माहीत असूनही विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजेच २४ तारखेला हॉलतिकीट दिले आहेत.


नेमकं प्रकरण काय?

एलएलएम सेमिस्टर १ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊन १५ दिवस उलटले आहे. ही परीक्षा २५ मे पासून सुरू होत असताना विद्यार्थ्यांना एक दिवस आधी हॉलतिकीट दिलं गेलं. हॉलतिकीट उशिरा मिळाल्याने काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचा शोध घेण्यास उशीर झाला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा एक गोंधळ संपतो ना संपतो तोच आता हॉलतिकीटांचा नवीन गोंधळ समोर येत असल्याचं बोललं जात आहे.


'४ ते ५ दिवस आधी हॉलतिकीट मिळावे'

अशा प्रकारे परीक्षेचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना एक दिवस आधी मिळाले, तर त्यांनी परीक्षा केंद्रांचा शोध कसा घ्यायचा? असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तसेच विद्यापीठाद्वारे किमान चार ते पाच दिवस आधी हॉलतिकीट जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांद्वारे करण्यात येत आहे.


एलएलएम सेमिस्टर १ या परीक्षेचे हॉलतिकीट आम्हाला सध्या मिळाले असून ते खूप उशीरा देण्यात आले. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी हे बरेच लांबून येत असल्याने त्यांना हॉलतिकीट घेऊन परत जावे लागते. त्यातच एक दिवस आधी पेपरचा अभ्यास करायचा की परीक्षा केंद्र शोधण्यासाठी वणवण फिरायचे? हा मोठा प्रश्न आहे.

अॅड. अभिषेक भट्ट, विद्यार्थी


विद्यापीठ प्रशासनाचा हा मनमानी कारभार सुरू असून त्यामुळे शिक्षणाचा पाया घसरत चालला आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांवर विद्यापीठ प्रशासनाने लक्ष केंद्रित करून हा सर्व गोंधळ लवकरात लवकर निस्तरावा.

सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कॉऊन्सिल



हेही वाचा

मुंबई विद्यापीठाचे उर्वरित निकालही लवकरच लागणार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा