Advertisement

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2025 : 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

12वी बोर्ड परीक्षा आणि 2025 मध्ये 10वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, mahasscboard.in वर उपलब्ध होईल.

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2025 : 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
SHARES

महाराष्ट्र (maharashtra) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एसएससी (SSC), एचएससी (HSC) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 2025 मधील एसएससी (SSC) आणि एचएससी (HSC)च्या परीक्षा नेहमीपेक्षा लवकर होतील.

परीक्षेच्या तारखांबाबत कोणतीही माहिती कळवण्यासाठी शाळांना 23 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रातील 12वी बोर्ड परीक्षा आणि 2025 मध्ये 10वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://mahasscboard.in/ वर उपलब्ध होईल.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी टाईम्स ऑफ इंडीयाला दिलेल्या निवेदनानुसार, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी अधिक वेळ देणे, लवकर निकाल आणि पुरवणी परीक्षा (exam) देणे आणि प्रवेश प्रक्रिया नीट पार पाडण्यासाठी तसेच यासह विविध कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षेचे वेळापत्रक:

  • 12वी एचएससी (HSC)लिखित परीक्षा: फेब्रुवारी 11 - मार्च 18
  • 12वी एचएससी (HSC) प्रात्यक्षिक परीक्षा: 24 जानेवारी - 10 फेब्रुवारी 
  • 10वी एसएससी (SSC) लिखित परीक्षा: फेब्रुवारी 21 - मार्च 17
  • 10वी एसएससी (SSC) प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा: फेब्रुवारी 3 - 20

एसएससी विद्यार्थ्यांसाठी लवकर परीक्षा आणि निकाल जाहीर केल्याने प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेश जलद होईल. 

याव्यतिरिक्त, फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये बाहेरुन बसणाऱ्या एसएससी (SSC)आणि एचएससी (HSC) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म-17 ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया मंगळवार, 13 ऑगस्टपासून सुरू होईल. फॉर्म 17 ऑगस्ट 13 ते 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असेल. एसएससी विद्यार्थ्यांसाठी शुल्क रु. 1,100, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 700 रुपये शुल्क भरावे लागेल.



हेही वाचा

जे.जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आलीशान घरे देण्याची योजना

दहिसर-मीरा भाईंदर लिंक रोडला लागणार आणखीन विलंब

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा