Advertisement

बारावीची परीक्षा गुरूवारपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला गुरूवारी २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे.

बारावीची परीक्षा गुरूवारपासून
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला गुरूवारी २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, यात ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी, तर ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनींचा समावेश आहे.


प्रथमच ऑनलाईन हॉलतिकीट

२१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ मडंळांमार्फत २ हजार ९५७ परीक्षा केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठी प्रथमच ऑनलाईन हॉलतिकीट देण्यात आलं असून, २० मार्च रोजी परीक्षा संपणार आहे. दरम्यान नऊ भाषा विषयांसाठी कृतीपत्रिका तर, विज्ञान आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.


मुंबईत तीन लाखांहून अधिक विद्यार्थी

बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागीय मंडळाचे एकूण ३ लाख, ३५ हजार, ४२८ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, मुंबई विभागात ५९२ परीक्षा केंद्र आहेत. दरवर्षीप्रमाणं यंदाही बारावीच्या परीक्षेकरिता वाणिज्य (कॉमर्स) शाखेसाठी सर्वाधिक १ लाख ८५ हजार ७७४ विद्यार्थी बसले आहेत. त्यापाठोपाठ विज्ञान शाखेतील ९१ हजार १७८ विद्यार्थी, कला शाखेतील ५४ हजार ०५६ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. तसंच M.C.V.C या शाखेतीलही ४ हजार ४२० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.


मोबाईलवर बंदी

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा शिक्षण मंडळानं २५२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्याशिवाय पेपर लीक होण्याच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान सर्व शिक्षकांनी आपले मोबाईल फोन केंद्र संचालकांकडे जमा करणं बंधनकारक असणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी पहिल्यांदाच सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजारांनी वाढली आहे. तर १३५ परीक्षा केंद्रं वाढवण्यात आली आहेत.हेही वाचा -

मुंबईतील आणखी तीन कॉलेजांना स्वायत्तता

बोर्डांच्या परिक्षेवेळी शिक्षकांचं 'असहकार आंदोलन'!संबंधित विषय
Advertisement