राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १२वीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार आहे. राज्यातील ३ हजार ३६ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यंदाच्या वर्षी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डा. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषेदेत माहिती दिली. १२वीच्या परिक्षेनिमित्त गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात २७३ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत.
राज्य
शिक्षण मंडळाच्या पुणे,
नागपूर,
औरंगाबाद,
मुंबई,
कोल्हापूर,
अमरावती,
नाशिक,
लातूर
आणि कोकण या ९
मंडळांमार्फत बारावीची परीक्षा
घेण्यात येणार आहे.
ही
परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८
मार्च या कालावधी होणार आहे.
या
परीक्षेसाठी राज्यभरातून
१५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांची
नोंदणी केलेली आहे.
यामध्ये
८ लाख ४३ हजार ५५२ विद्यार्थी
तर ६ लाख ७१ हजार ३२५ विद्यार्थिनी
परीक्षा देणार आहेत.
राज्यातील
एकूण ९ हजार ९२३ कनिष्ठ
महाविद्यालयांमधून या
विद्यार्थांनी नोंदणी केली
आहे.
परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळातर्फे २७३ भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय प्रत्येक जिल्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. एक महिलांचं भरारी पथक असणार आहे. तसंच, महापालिकेचं पण भरारी पथक नेमण्यात आलं आहे.
सोशल
मीडियावर
प्रश्नपत्रिका फुटण्याची
शक्यता असते.
यावर
प्रतिबंध आणण्यासाठी विद्यार्थांना
कोणतंही
इलेक्ट्रॉनिक साधन व साधा
किंवा स्मार्ट फोन घेऊन जाण्यास
बंदी आहे.
तसंच,
परीक्षा
केंद्रावर पर्यवेक्षकांसह
केंद्रसंचालक,
परीक्षक
यांना परीक्षा काळात मोबाईल
वापरण्यास बंदी अाहे.
या
सर्वांचे
मोबाईल जमा करून एका ठिकाणी
ठेवले जाणार आहेत.
याबाबत
परीक्षा केंद्र चालकांना
सक्त सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना
परीक्षेबाबत अडचणी असल्यास
त्याचं
निराकरण करण्यासाठी मंडळानं
हेल्पलाइन सुरू केल्या आहेत.
शाखा
निहाय नोंदणी केलेले
विद्यार्थी
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन
हेही वाचा -
Video: माझगावच्या GST भवन इमारतीला भीषण आग
IPL2020- आयपीएलच्या १३व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर