Advertisement

विद्यापीठ परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार कुलगुरूंची बैठक


विद्यापीठ परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार कुलगुरूंची बैठक
SHARES
Advertisement

पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुलगुरूंची बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानं परीक्षांबाबत अंतिम निर्णय होत नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. परीक्षांबाबत निर्णयासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागानं नियुक्त केलेल्या समितीनं एक प्रारूप आराखडा तयार केला असून, यामध्ये सर्व कुलगुरू परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचं समजतं.

हेही वाचा - अखेर ठरलं! दहावी भूगोलच्या पेपरला मिळणार ‘इतके’ गुण

राज्यात अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार जाहीर केला. परंतु, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परिस्थिती नियंत्रणात येण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याचं सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आयोगाला पत्र लिहिलं. तसंच, अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याबाबत विनंती केली. त्यानंतर विद्यार्थ्यांमधील गोंधळ अधिक वाढला.

या सर्व घटनेनंतर सामंत यांनी सोमवारी कुलगुरूंची बैठक बोलावत मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, असाच निर्णय घेतला जाणार असल्याचं स्पष्ट केलं. त्याशिवाय, एका समितीची स्थापना केली असून, या समितीनं आपला अहवाल तयार केला आहे. हा अहवाल समितीनं सरकार आणि राज्यपालांकडं सादर केला आहे. 

हेही वाचा - राज्यात १५ जूनपासून शाळा होणार सुरू

या अहवालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली. परीक्षा न घेण्याचा विचार यापूर्वी सरकारतर्फे मांडण्यात आला होता. त्याला सर्व कुलगुरूंनी विरोध करून तसं झाल्यास विद्यापीठांच्या राष्ट्रीय तसंच, आंतरराष्ट्रीय नामांकनावर परिणाम होऊ शकतो आणि ते विद्यार्थीहिताचेही नसेल असे मत यामध्ये मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -

ऑनलाईन दारू विक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा नवा फंडा, 73 फोन नंबर पोलिसांनी टाकले ब्लॅक लिस्टमध्ये

कोरोनाविरोधातील लढाईत आर्थिक बळ, बंधपत्रित डाॅक्टारांच्या मानधनात मोठी वाढसंबंधित विषय
Advertisement