Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

कोरोनाविरोधातील लढाईत आर्थिक बळ, बंधपत्रित डाॅक्टारांच्या मानधनात मोठी वाढ

बंधपत्रित डाॅक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे. शिवाय कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टारांचं मानधन समान करण्याचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.

कोरोनाविरोधातील लढाईत आर्थिक बळ, बंधपत्रित डाॅक्टारांच्या मानधनात मोठी वाढ
SHARES

कोरोनाविरोधातील लढ्यात जीव धोक्यात घालून डाॅक्टर दिवस-रात्र सेवा देत असताना डाॅक्टरांच्या या मेहनतीला ठाकरे सरकारने मोठं आर्थिक बळ दिलं आहे. राज्य सरकारने शुक्रवार २९ मे २०२० रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बंधपत्रित डाॅक्टरांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे. शिवाय कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टारांचं मानधन समान करण्याचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. 

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुससार बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसंच कंत्राटी डॉक्टर आणि त्यांचं मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार असून डॉक्टर्सनासुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार, असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

मानधनात किती वाढ?

  • आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टर्सना ६० हजारांच्याऐवजी ७५ हजार रुपये
  • आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजारऐवजी ८५ हजार
  • इतर भागातील MBBS डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार रुपये मानधन.
  • इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रु. मानधन मिळणार

हेही वाचा - अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

 याआधी बंधपत्रित डाॅक्टर आणि नर्सच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. कोरोनाच्या लढाईतील हे योद्धे असल्याने त्यांच्या वेतनातील कपात योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा पुन्हा आढावा घेण्याची विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना केली होती. त्यानुसार त्यांनी या वेतन कपातीचा आढावा घेऊन डाॅक्टरांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या कोरोना योद्ध्यांना नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. 

तर काही दिवसांपूर्वी या मानधन कपातीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याप्रश्नी दखल घेण्याची विनंती केली होती. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व आरोग्य सेवा (maharashtra health department) आयुक्तलयानं २० एप्रिल रोजी एक परिपत्रक काढलं होतं. त्यानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचं मासिक मानधन ५५ हजार आणि ६० हजार (monthly salary) असं कंत्राटी सेवेच्या निकषावर निश्चित करण्यात आलं आहे. त्याआधी वेतन आणि भत्ते मिळून या वैद्यकीय अधिकाऱ्यांना  ७८ हजार इतकं मानधन मिळत होतं. या अर्थाने त्यांच्या मानधनात २० हजार रुपयांची कपात झाली आहे.

बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. याआधी त्यांना ३५ हजार रुपये इतकं एकत्रित मानधन मिळत होतं. परंतु नव्या आदेशानुसार त्यांचं मानधन १० हजार रुपयांनी घटून २५ हजार रुपयांवर आलं आहे. डॉक्टर आणि परिचारिकांच्या मानधनातील ही कपात अन्यायकारक आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.

हेही वाचा - अमित ठाकरेंनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट, केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा