Advertisement

राज्यातली महाविद्यालयेही सुरु होण्याची शक्यता, उदय सामंत म्हणाले...

उदय सामंत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

राज्यातली महाविद्यालयेही सुरु होण्याची शक्यता, उदय सामंत म्हणाले...
SHARES

महाविद्यालयं ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र विभागाकडून मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. उदय सामंत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता दिल्यानंतरच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे

सोमवारपासून शाळा सुरू होतायत. मात्र १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरू असतानाही महाविद्यालयं सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. महाविद्यालयांबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती उच्च आणि शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलीय.

दरम्यान १५ फेबुवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ठाम असल्याचं सामंत यांनी सांगितलंय.

कोरोना काळात दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असताना तिसऱ्या लाटेत पुन्हा महाविकास आघाडी सरकारनं शाळांवर गंडांतर आणत शाळा महाविद्यालये बंद केली आहेत.

राज्यात आणि देशात १५ वर्ष ते १८ वर्ष वयोगटातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू केले असताना कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे कमी असल्यानं इतर आस्थापन, बार मॉल हे सर्व सुरू आहे. परंतु, शाळा महाविद्यालये बंद ठेवणं म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटण्या सारखं आहे.

शासनानं तत्काळ शाळा महाविद्यालयं २६ जानेवारी पर्यंत सुरू करावीत, अन्यथा भाजप कार्यकर्ते शिक्षक विद्यार्थी यांच्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा संतोष शेट्टी यांनी दिला आहे.

राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळांबरोबरच, पूर्व प्राथमिक अर्थात शिशु वर्गही येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळं बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.हेही वाचा

ठरलं! २४ जानेवारीपासून शाळा सुरू, आदित्य ठाकरेंची माहिती

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा