Advertisement

पाठ्यपुस्तकांसह उत्तरपत्रिकेतही बदल!

जुन्या उत्तरपत्रिकेचं स्वरूप OMR (optical mark reader) अशा पद्धतीचं असून नवीन उत्तरपत्रिकेचं स्वरूप OSM (on screen marking) असं असणार आहे. यामुळे नवीन उत्तरपत्रिकेत परीक्षा क्रमांक तसंच परीक्षेतील पेपरचा कोड लिहावा लागणार नाही. यामुळे परीक्षेत परीक्षा क्रमांक व पेपरचा कोड चिन्हांकित करण्याची गरज भासणार नाही.

पाठ्यपुस्तकांसह उत्तरपत्रिकेतही बदल!
SHARES

सन २०१८-१९ पासून शैक्षणिक अभ्यासक्रमात चांगले बदल होत असताना बोर्डाच्या उत्तरपत्रिकेतही बदल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या बदलामुळे बोर्डाच्या उत्तरपत्रिकेचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. किंबहुना या उत्तरपत्रिका 'स्टुडंन्ट आणि टिचर फ्रेंडली' होणार आहेत. या उत्तरपत्रिका आगामी परीक्षेपासून देण्यात येतील.


कशी असेल नवी उत्तरपत्रिका?

जुन्या उत्तरपत्रिकेचं स्वरूप OMR (optical mark reader) अशा पद्धतीचं असून नवीन उत्तरपत्रिकेचं स्वरूप OSM (on screen marking) असं असणार आहे. यामुळे नवीन उत्तरपत्रिकेत परीक्षा क्रमांक तसंच परीक्षेतील पेपरचा कोड लिहावा लागणार नाही. यामुळे परीक्षेत परीक्षा क्रमांक व पेपरचा कोड चिन्हांकित करण्याची गरज भासणार नाही.


आॅनलाइन अटेंडन्स

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर एक विशिष्ट पद्धतीचा स्टिकर लावण्यात येणार आहे. या स्टिकरमध्ये विद्यार्थ्यांच्या आसन क्रमांकाबरोबर विषयाचा कोड, परीक्षेचं नाव आणि विद्यार्थ्यांचा फोटो अशी सर्व माहिती असणार आहे. दरम्यान फक्त परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर हा स्टिकर लावण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती लागणार आहे.


उत्तरपत्रिकेवर विशिष्ट पद्धतीचा स्टिकर

उत्तरपत्रिकांचं मुखपृष्ठही बदलण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर लावलेल्या विशिष्ट पद्धतीच्या स्टिकरचा फायदा पर्यवेक्षकांना होणार असून त्यांना फक्त अनुउपस्थित आणि कॉपी करणाऱ्या मुलांच्या नोंदी संगणकावर कराव्या लागणार आहेत. संगणकावर या विद्यार्थ्यांच्या नोंदी करताना अनुउपस्थित विद्यार्थ्यांकरिता ‘A’ आणि कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला ‘C’ या दोन अक्षरांनी नोंदी करायच्या आहेत. त्यामुळे पर्यवेक्षकांचा वेळ वाचणार असून त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती मोजावी लागणार नाही.


विद्यार्थ्याची पूर्ण माहिती

यामुळे व्यक्तिमत्व उपस्थिती पत्रक (manual attendence sheet) बाद होणार असून ऑनलाईन उपस्थिती पत्रक (online attendence sheet ) येणार आहे. त्याशिवाय विद्यापीठाला उत्तरपत्रिका तपासणीसाठी येण्याआधी विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती विद्यापीठाकडे असणार आहे.


नवीन उत्तरपत्रिकेचा नियम येत्या ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणाच्या घटनांना निश्चितच आळा बसेल. विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक व विद्यापीठाचाही वेळ वाचणार आहे.
- विनोद मळाले, उपकुलसचिव (जनसंपर्क), परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा-

इथंही राजकारण! दहावीच्या पुस्तकात भाजपा, शिवसेनेचं गुणगान

दहावीच्या विज्ञानातच चुकीचे 'ज्ञान', भूगोलानंतर याही पुस्तकात चुका!

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले १८ निकाल लवकरच!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा