Advertisement

शिक्षक पात्रता परीक्षेवर लवकरच निर्णय

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत महाधिवक्ता यांचं मत विचारात घेऊन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

शिक्षक पात्रता परीक्षेवर लवकरच निर्णय
SHARES

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत महाधिवक्ता यांचं मत विचारात घेऊन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना न्याय देण्याबाबत सदस्य नागोराव गाणार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी आवश्यक आहे. ही किमान अर्हता प्राप्त करण्यासाठी वाढीव संधी देण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. केंद्र सरकारला यासाठी पत्र पाठवून विनंतीदेखील करण्यात आली आहे.

राज्यात १६ वेळा ही परीक्षा घेण्यात आली. ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना ती आयुष्यभरासाठी लागू राहावी, अशी शासनाची भूमिका आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी सभापतींकडे लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गिरीशचन्द्र व्यास, विक्रम काळे कपिल पाटील आदींनी सहभाग घेतला.

हेही वाचा- अकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईनच- वर्षा गायकवाड

तर, राज्यातील सहयोगी प्राध्यापक पदोन्नती व वेतन निश्चिती पडताळणीबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या त्रुटी निवारण समितीकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून ते प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात सदस्य अरुण लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते  बोलत होते.

राज्यात सुमारे ५०० प्राचार्यांची पदे भरावयाची होती. त्यापैकी २६० प्राचार्यांची भरती करण्यात आलेली आहे. उर्वरित पदांबाबत वित्त विभागाने परवानगी दिल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी दिली.

(maharashtra government soon take decision on teacher eligibility exam says varsha gaikwad)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा