Advertisement

१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि १२ वीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहेत

१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि १२ वीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहेत. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा मंगळवार दिनांक ३ मार्च २०२० ते सोमवार, दिनांक २३ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसंच, इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२० ते बुधवार दिनांक १८ मार्च २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहे.

अंतिम वेळापत्रक

शिक्षण मंडळाचं हे अंतिम वेळापत्रक पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी आहे.

हेही वाचा - ‘आयडॉल’ला हवाय प्रभावी संचालक

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना तसंच, कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार असल्याचंही शिक्षण मंडळानं जाहीर केलं. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळानं छापील स्वरुपात दिलेली वेळापत्रकंच अंतिम असणार आहेत.

तारखांची खात्री

त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेनं छपाई केलेलं, तसंच व्हॉट्सअॅपवर किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरलं जाऊ नये असे आवाहन शिक्षण मंडळानं केलं आहे.



हेही वाचा -

मेट्रोविरोधात शिवसेनेचं गिरगावात आंदोलन

‘टीक टाॅक’ मुळे मुलांवर वाईट संस्कार, अॅपवर बंदीसाठी ३ मुलांच्या आईची हायकोर्टात याचिका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा