Advertisement

‘टीक टाॅक’ मुळे मुलांवर वाईट संस्कार, अॅपवर बंदीसाठी ३ मुलांच्या आईची हायकोर्टात याचिका

‘टीक टाॅक’ या मोबाइल व्हिडिओ शेअरिंग अॅपमुळे मुलांवर वाईट संस्कार होत असल्याने या अॅपवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका (PIL) सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

‘टीक टाॅक’ मुळे मुलांवर वाईट संस्कार, अॅपवर बंदीसाठी ३ मुलांच्या आईची हायकोर्टात याचिका
SHARES

‘टीक टाॅक’ या मोबाइल व्हिडिओ शेअरिंग अॅपमुळे मुलांवर वाईट संस्कार होत असल्याने या अॅपवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका (PIL) सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. 

हीना दरवेश नावाच्या ३ अल्पवयीन अपत्य असलेल्या मुंबईतील गृहिणीनं ही याचिका दाखल केली आहे. वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. टीकटाॅकमुळे तरूणांवर विशेषकरून लहान मुलांवर वाईट संस्कार होत आहे. टीकटाॅकच्या व्यसनामुळे मानसिक संतुलन ढासळत असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकेतील दावा 

  • शिवाय व्हिडिओ शेअरिंगमुळे दोन धार्मिक गटांमध्ये द्वेष पसरणे 
  •  शत्रूत्व तयार होणे असे प्रकारही सर्रास घडत आहेत  
  • याचा देशाच्या एकात्मतेवर परिणाम होत आहे 
  • यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन होत आहे 
  • टीकटाॅकमुळे देशाचा, वेळ, पैसा आणि न्यायपालिकेच्या यंत्रणेचाही अपव्यय होत आहे    

जुलै महिन्यात धार्मिक द्वेष पसरवणारा एक वादग्रस्त व्हिडिओ/आॅडियो व्हायरल झाला होता. त्याविरोधात मुंबईत गुन्हा (FIR) देखील दाखल करण्यात आला होता. परंतु अजूनही हे अॅप चालवणाऱ्या कंपनीविरोधा कारवाई करण्यात आलेली नाही.  

टीकटाॅकद्वारे अश्लिल साहित्य पसरत असल्याने ही सामुग्री अल्पवयीन मुलांच्या हाती लागू शकते, असं म्हणत मद्रात उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. या अॅपवर लावलेली बंदी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने २४ एप्रिल रोजी उठवली होती. मुंबई उच्च न्यायालय याबाबत काय निर्णय घेते, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


हेही वाचा- 

आता फेसबुकवरूनही करा पेमेंट

व्हॉट्स अॅपच्या डार्क मोडसाठी करावी लागेल प्रतिक्षासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा