Advertisement

आता फेसबुकवरूनही करा पेमेंट


आता फेसबुकवरूनही करा पेमेंट
SHARES

फेसबुकनं आपली बहुप्रतिक्षित पेमेंट सेवा अखेर सुरू केली आहे. पण भारतीय युजर्सना या सेवेसाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल. या नवीन सेवेमुळे फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपद्वारे पेमेंट करणं सोपं होईल. सध्या अमेरिकेत ही सेवा सुरू झाली असून वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात ही सेवा सुरू करण्यात येईल

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही प्लॅटफॉर्मवर युजर्सला वस्तूंची विक्री करण्यात येते. फेसबुक हे मार्केटप्लेससाठी आहे तर इन्स्टाग्राम शॉपिंग फिचर्ससाठी आहे. फेसबुक पे द्वारे आजा युजर्सला शॉपिंग, रक्कम डोनेट करणं आणि मित्रांना पैसे पाठवणं सोपे होणार आहे.

युजर्सच्या सुरक्षेची देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. युजर्सला स्वत:च्या सोयीनुसार पेमेंट पद्धत निवडता येऊ शकते. प्रत्येक पेमेंटची माहिती टाकण्याचीही युजर्सला गरज नाही. युजर्स पेमेंट हिस्ट्री पाहू शकतील आमि पेमेंटची पद्धतही बदलू शकतील. ही सेवा युपीआय प्रणालीवर आधारीत असल्यानं ती सुरक्षित असेल. डिसेंबर अखेरीसही या सेवेचा भारतीय युजर्स लाभ घेऊ शकतील.


फेसबुक पे चा वापर कसा कराल?

मोबाईल किंवा वेबसाईट्सवर जाऊन फेसबुक पेमध्ये सेटिंग्स पर्याय निवडा

पेमेंटची पद्धत निवडा

त्यानंतर कधीही व्यवहार करताना फेसबुक पे ची निवड करा.


हेही वाचा

'या' कारणामुळे फेसबुकचा लोगो १० वर्षांनी बदलला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा