'या' कारणामुळे फेसबुकचा लोगो १० वर्षांनी बदलला

फेसबुकनं युजर्ससाठी नव नवीन फिचर्स आणले. पण या सर्व प्रवासात फेसबुकचा लोगो कायम होता. पण आता त्यात तुम्हाला बदल जाणवतील.

  • 'या' कारणामुळे फेसबुकचा लोगो १० वर्षांनी बदलला
SHARE

फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटनं तब्बल दहा वर्षांनंतर आपल्या लोगोमध्ये बदल केले आहेत. स्मार्टफोनधारकांना डोळ्यासमोर ठेवून नवा लोगो तयार करण्यात आला आहे. फेसबुकचा नवा लोगो काही आठवड्यातच युजर्सना पाहायला मिळू शकतो.

फेसबुकनं आतापर्यंत आपल्या साईटवर अनेक बदल केलेत. युजर्ससाठी नवनवीन फिचर्स देखील आणले. पण या सर्व प्रवासात फेसबुकचा लोगो कायम होता. त्यात कधी बदल करण्यात आले नाही.  पण अखेर २००५ साली बनवण्यात आलेला फेसबुकचा लोगो बदलण्यात आला.


लोगोत काय बदललं?

तसं पाहिलं तर आपल्याला लोगोमधले बदल जाणवणार नाहीत. पण निरिक्षण केल्यावर तुम्हाला हे बदल नक्की दिसून येतील. नवीन लोगोमध्ये फेसबुकच्या नावातील अक्षरं थोडी बारीक करण्यात आली आहेत. यात व्हाईट स्पेस वाढलेली आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे a अक्षर हे राऊंडेड पद्धतीनं काढलं आहे. या नव्या लोगोमध्ये सर्व इंग्रजी अक्षरं कॅपिटलमध्ये म्हणजे FACEBOOK असे आहेत. हा लोगो वेगवेगळ्या रंगात असून हे रंग इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्स अॅपसारख्या फेसबुकचे इतर प्रोडक्ट दर्शवतात. नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे.


लोगोत का केले बदल?

अलीकडच्या काळात स्मार्टफोनवर फेसबुकचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा नवीन लोगो स्मार्टफोनवर चांगल्या प्रकारे दिसून यावा यासाठी हा बदल केल्याचं बोललं जातं. याशिवाय व्हाट्स अ‍ॅप, इंस्टाग्रामसह अन्य सोशल मीडिया अ‍ॅप पेक्षा स्वतःला वेगळे दर्शवण्यासाठी असं करण्यात आलं आहे. फेसबुकशिवाय ट्विटर आणि लिंक्डइन सारख्या अन्य सोशल मीडिया अ‍ॅप्सचा रंग देखील जवळपास सारखाच आहे. त्यामुळे लोगोमध्ये बदल केले गेले आहेतहेही वाचा

'या' कारणामुळे फेसबुक-इन्स्टावरील इमोजींवर बंदी

'गुगल पे'मध्ये नवीन फिचर लाँच, आता असेही पाठवता येणार पैसेसंबंधित विषय
ताज्या बातम्या