Advertisement

'या' कारणामुळे फेसबुक-इन्स्टावरील इमोजींवर बंदी

फेसबुकनं काही इमोजींवर बंदी आणली आहे. फेसबुकसोबतच इन्स्टाग्रामवर देखील चॅट करताना काही इमोजी वापरता येणार नाहीत.

'या' कारणामुळे फेसबुक-इन्स्टावरील इमोजींवर बंदी
SHARES

चॅट करताना मनात उमटलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण शब्दांऐवजी इमोजीचा (Emoji) आधार घेतो. परंतु आता यावर देखील मर्यादा येण्याची शक्यता आहे. फेसबुकनं (Facebook) काही इमोजींवर बंदी आणली आहे. फेसबुकसोबतच इन्स्टाग्रामवर (Instagram) देखील चॅट करताना काही इमोजी वापरता येणार नाहीत.

'या' इमोजींवर बंदी

'वांगे' आणि 'पीच' या दोन इमोजींवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये वांगे आणि पीच या दोन इमोजींचा वापर अश्लील संभाषण करण्यासाठी केला जात आहे. अश्लील संभाषण आणि संबंधित सामग्रीवर निर्बंध यावेत यासाठी फेसबुकनं या दोन इमोजींवर बंदी घातली. अशाच प्रकारच्या आणखी काही इमोजींना काढून टाकण्यात येईल.


सुरक्षेसाठी सर्व काही

फेसबुकच्या सुरक्षा यंत्रणेवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांचे अकाऊंट देखील हॅक झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणखी प्रबळ करण्याकडे फेसबुकचा अधिक कल आहे. सुरक्षा यंत्रणा प्रबळ करण्यासाठी फेसबुकनं आपल्या नियमावलीत बदल केले आहेत. याच्या अंतर्गतच वांगे आणि पीच या दोन इमोजींना फेसबुकवर वापरास बंदी करण्यात आली आहे.हेही वाचा

राजकीय जाहिरातींना ट्वीटरवर बंदी

'गुगल पे'मध्ये नवीन फिचर लाँच, आता असेही पाठवता येणार पैसे


संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा