Advertisement

'गुगल पे'मध्ये नवीन फिचर लाँच, आता असेही पाठवता येणार पैसे

यापूर्वी पैशांच्या संदर्भात व्यवहार करण्यासाठी पिन क्रमांक द्यावा लागत होता. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.

'गुगल पे'मध्ये नवीन फिचर लाँच, आता असेही पाठवता येणार पैसे
SHARES

अवघ्या काही मिनिटात पैसे ट्रान्सफर करणं आता काही कठिण नाही. यासाठी अनेक अॅप युजर्स वापरतात. त्यापैकीच एक अॅप म्हणजे गुगल पे. गुगल पे वापरणाऱ्यांसाठी एक नवीन फिचर लाँच करण्यात आलं आहे. यापूर्वी पैशांच्या संदर्भात व्यवहार करण्यासाठी पिन क्रमांक द्यावा लागत होता. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.

गुगलनं नव्या अपडेटनुसार गुगल पे (G Pay) मध्ये बायोमेट्रिक एपीआय (Biometric API) सपोर्ट दिला आहे. त्यानुसार युजर्सला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फिंगरप्रिंट (Fingerprint Authentication) आणि फेस ऑथेंटिकेशनचा उपयोग करता येणार आहे. हे नवे फिचर पिन क्रमांकापेक्षा अधिक वेगानं काम करणार आहे. मात्र सध्या हे फिचर अॅन्ड्रॉइड १० साठी काम करते. तर लवकरच अॅन्ड्रॉइड ९ व्हर्जनसाठी सुद्धा हे काम करणार आहे.

युजर्सला हे नवं ऑप्शन अॅपच्या सेंडिंग मनी इथं दिसून येणार आहे. तसंच गुगल पे युजर्सला बायोमेट्रिक किंवा या अन्य फिचर्सच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहेत. बायोमेट्रिक फिचर हे फक्त पैसे पाठवण्यासाठीच असणार आहे. हे फिचर 2.100 व्हर्जनमध्ये रोलआउट करण्यात आलं आहे.


हेही वाचा

गुगलचं 'हे' अॅप वापराल तर मोबाइल कायमचा गमवाल

स्नॅपचाटला टक्करं देणारं इन्स्टाग्रामचं नवीन अॅप


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा