Advertisement

राजकीय जाहिरातींना ट्वीटरवर बंदी

ट्वीटरच्या (Twitter) सीईओ जॅक डोरसे (Jack Dorsey) यांनी त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवरुन राजकीय जाहिरांना जागतिक स्तरावर बंदी घातली आहे.

राजकीय जाहिरातींना ट्वीटरवर बंदी
SHARES

ट्वीटरवर आता राजकीय जाहिरातींना बंदी घालण्यात आली आहे. सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध नेटवर्किंग साईट ट्वीटरच्या (Twitter) सीईओ जॅक डोरसे (Jack Dorsey) यांनी त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवरुन राजकीय जाहिरांना जागतिक स्तरावर बंदी घातली आहे. याबाबत डोरसे यांनी ट्वीट केलंय. राजकीय जाहिराती ट्वीटरवर बंद करण्यामागील कारणसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे.

... म्हणून बंदी आवश्यक

राजकीय जाहिराती इंटरनेटवर अधिराज्य गाजवतात आणि व्यावसायिक जाहिरातदारांसाठी ते अत्यंत प्रभावी असल्याचं सिद्ध होत होतं. व्यावसायिक जाहिरातींसाठी, तरीही हे ठीक म्हटलं जाऊ शकतं, परंतु राजकारणात हे धोकादायक असू शकतं, असं जॅक डोरसे यांनी स्पष्ट केलं.


कधीपासून लागू होणार?

ट्वीटर या निर्णयासह फायनल पॉलिसी १५ नोव्हेंबरपर्यंत जाहीर करणार आहे. त्यानंतर हा निर्णय २२ नोव्हेंबरपासून लागू होणार असून जाहिराती बंद करण्यापूर्वी जाहिरातदारांना एक नोटीस पिरियड सुद्धा दिला जाणार आहे.  राजकीय जाहिरातींसाठी काही नियम असणं आवश्यक असल्याचं डोरसे यांनी सांगितलं.

फेसबुकचं स्पष्टीकरण

फेसबुकनं यापूर्वीच राजकीय जाहिरात दाखवणं बंद करणार नाही असं घोषित केलं होतं. फेसबुक सीईओ मार्क जुकरबर्गनुसार, राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याचा फायदा फक्त सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो. हेही वाचा

पैशाच्या व्यवहारासाठी युपीआय वापरताय? मग 'ही' काळजी 

'गुगल पे'मध्ये नवीन फिचर लाँच, आता असेही पाठवता येणार पैसे


संबंधित विषय
Advertisement