Advertisement

पैशाच्या व्यवहारासाठी युपीआय वापरताय? मग 'ही' काळजी घ्या

डिजिटलमुळे पैशांचा व्यवहार करणं आता बऱ्यापैकी सर्व सोपं झालं आहे. पण अशा व्यवहारात फसवणूक होण्याचा धोका देखील अधिक असतो. फसवणूक होऊ नये म्हणून हे नियम पाळा.

पैशाच्या व्यवहारासाठी युपीआय वापरताय? मग 'ही' काळजी घ्या
SHARES

आता ऑनलाईनचा जमाना आहे. त्यामुळे जो काही पैशांचा व्यवहार होतो तो डिजिटल करण्याकडे अधिक भर असतो. डिजिटलमुळे पैशांचा व्यवहार करणं देखील सोपं झालं आहे. नाहीतर आधी एका ठिकाणाहून पैसे पाठवले तर दोन-तीन दिवसांनी पैसे मिळायचे. पण आता बऱ्यापैकी सर्व सोपं झालं आहे. पण अशा व्यवहारात फसवणूक होण्याचा धोका देखील अधिक असतो.

सध्या युपीआय सुविधेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सुविधेच्या माध्यमातून अवघ्या काही तासांमध्ये पैसे ट्रान्सफर होतात. मात्र या पद्धतीनं पैसे पाठवत असाल तर सावधगिरी कशी बाळगायची हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

) तुमचा बँक खाते क्रमांक, UPI पिन क्रमांक किंवा OTP क्रमांक कधीच कोणाला देऊ नका. जर कधी या माहितीसाठी फोन आला तर समजून जा की काही तरी गडबड आहे. कारण कोणत्याही बँकेतून तुमच्या व्यक्तीगत खात्याबद्दल फोनवरून विचारलं जात नाही

) UPI डाऊनलोड करताना त्याची अधिकृतता तपासून घ्यावी

) कोणतेही चुकीचे अॅप डाऊनलोड करण्यापासून दूर रहा. अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी योग्य ती माहिती पडताळून पाहा.

) सुरक्षित अॅन्टीव्हायरसचा उपयोग करा.



हेही वाचा

'गुगल पे'मध्ये नवीन फिचर लाँच, आता असेही पाठवता येणार पैसे

आता 'या' मोठ्या देशात जाता येईल 'व्हिसा'शिवाय, भारतीयांना दिली खास सवलत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा