Advertisement

आता 'या' मोठ्या देशात जाता येईल 'व्हिसा'शिवाय, भारतीयांना दिली खास सवलत

ब्राझील सरकारने पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयानुसार भारतीय पर्यटकांना आता व्हिसा शिवाय प्रवेश घेता येणार आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी ही घोषणा केली आहे.

आता 'या' मोठ्या देशात जाता येईल 'व्हिसा'शिवाय, भारतीयांना दिली खास सवलत
SHARES
Advertisement

ब्राझील सरकारने पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयानुसार भारतीय पर्यटकांना आता व्हिसा शिवाय प्रवेश घेता येणार आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी ही घोषणा केली आहे.

पर्यटनवाढीसाठी

ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांदरम्यान पर्यटन आणि व्यापारी संबंध अधिक दृढ व्हावे म्हणून ब्राझील सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासोबत काही दिवसांपूर्वीच ब्राझीलने आणखी काही देशांनाही ही सवलत देऊ केली आहे. या देशांची नावं पुढीलप्रमाणे:

  • अमेरिका
  • कॅनडा
  • जपान
  • ऑस्ट्रेलिया 
  • चीन 

धोरणांचा भाग

ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जायर बोल्सोनारो राष्ट्रपती म्हणून निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी आपली धोरणं राबवण्यास सुरूवात केली आहे. या धोरणातील एक भाग म्हणून त्यांच्या सरकारने विकसनशील देशांतील पर्यटकांना विनाव्हिसा प्रवेश देण्याचं ठरवलं आहे.  

‘ब्रीक्स’ परिषद

येत्या १४ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ब्राझीलची राजधानी ब्रासीलिया या ठिकाणी ‘ब्रीक्स’ देशांची (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका) परिषद होणार आहे. या बैठकीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या बैठकीत मोदी आणि बोल्सोनारो यांच्यात अनेक मुद्द्यांवर करार होणार आहेत. याआधी या दोन्ही नेत्यांमध्ये जी-२० बैठकीत चर्चा झाली होती.हेही वाचा-

देशातील पहिले ११ स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स मुंबईत

उद्धव ठाकरेंचा मुलगा तेजसचा कारनामा, बघा काय शोधून काढलंय?संबंधित विषय
Advertisement