व्हॉट्स अॅपच्या डार्क मोडसाठी करावी लागेल प्रतिक्षा

गुगल क्रोम, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन आणि ट्विटरवर डार्क मोडचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु आतापर्यंत व्हॉट्स अ‍ॅपवर ही सुविधा नव्हती. पण लवकरच व्हॉट्स अॅपवर डार्क मोड फिचर उपलब्ध होईल.

SHARE

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपचं डार्क मोड येणार याची जोरदार चर्चा सुरू होती. पण या फिचरसाठी युजर्सना काही काळाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण यामध्ये एक बग आला आहे. त्यामुळे डार्क मोड फिचर हे क्रॅश होत असल्याचं समोर येत आहे. हे फिचर आयफोनमधील जरी असले तरी अँड्रॉइडकडून स्मार्टफोनसाठी देखील डार्क मोडबाबतचे टेस्टिंग सुरू आहे

गुगल क्रोम, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन आणि ट्विटरवर डार्क मोडचा पर्याय देण्यात आला आहे. परंतु आतापर्यंत व्हॉट्स अ‍ॅपवर ही सुविधा नव्हती. पण लवकरच व्हॉट्स अॅपवर डार्क मोड फिचर उपलब्ध होईल. डार्क मोड या फिचरचा सध्या एक फोटो लीक झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटोत व्हॉट्स अॅपमध्ये ब्लॅक रंगावर पांढऱ्या रंगात अक्षरे आलेली दिसत आहेत. मात्र यात काही बदलांची गरज आहे. शिवाय यामध्ये एक बबल नावाचा बग देखील आढळून आला आहे. त्यामुळे या फिचरची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही


व्हॉट्स अॅपच्या डार्क मोडमध्ये काळा किंवा ग्रे रंगाचा वापर करण्यात येणार नाही. यावेळी व्हॉट्स अॅपनं दोन वेगवेगळ्या कलर्सच्या डार्क मोडचा पर्याय देण्याचा विचार केला आहे. काला आणि ग्रे ऐवजी डार्क ब्ल्यू आणि ग्रीन या रंगांचा वापर करण्यात येईल. जर तुमच्या मोबाइलमधील सीस्टम वाईड डार्क मोड हा पर्याय आधीच निवडलेला असेल तर आपोआपच तुमच्या व्हॉट्स अॅपचा रंग बदलेल

नुकतंच व्हॉट्स अॅपनं प्रायव्हसी फिचर सुरू केले आहे. या फिचरनुसार युजर्सच्या संमतीशिवाय त्यांना कुणी ग्रुपमध्ये अॅड करू शकत नाही. या फिचरनंतर आता सर्वांना डार्क मोड या फिचरची प्रतिक्षा आहे. त्यावरील काम पूर्ण झालं की व्हॉट्स अॅपच्या डार्क मोड या फिचर्सची अधिकृत घोषणा होऊ शकते.हेही वाचा

'या' कारणामुळे फेसबुक-इन्स्टावरील इमोजींवर बंदी

पैशाच्या व्यवहारासाठी युपीआय वापरताय? मग 'ही' काळजी घ्या


संबंधित विषय
ताज्या बातम्या