Advertisement

मेट्रोविरोधात शिवसेनेचं गिरगावात आंदोलन


मेट्रोविरोधात शिवसेनेचं गिरगावात आंदोलन
SHARES

मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळं मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जाव लागतं. त्यामुळं मुंबईकरांचा त्रास लक्षात घेत शिवसेनेनं मेट्रोच्या कामाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गिरगावात मेट्रो ३ विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन करत गाड्यांची तोडफोड केली आहे. गिरगावात सुरू असणाऱ्या मेट्रो ३ च्या विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना आक्रमक होती. परंतु, सोमवारी शिवसेनेनं आंदोलन करत गाड्यांची तोडफोड केली.

हेही वाचा - आयएनएस विराट जाणार भंगारात

डंपरमुळं अपघात

मेट्रोच्या कामांमुळे रस्त्याच्या बाजूला डंपर २४ तास सुरु असतात. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीच्या समस्या उद्भवतात. त्यामुळं मोठ्या प्रमाणात डंपरमुळं अपघात देखील होतात. त्याशिवाय, आवाज आणि गोंगाटामुळं जगणं कठीण झालं असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे. 'जोपर्यंत डंपर बंद होत नाहीत. तसेच जोपर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील’, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

हेही वाचा - लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये 'याची' प्रचंड वाढ

गाड्यांचं मोठं नुकसान

या दगडफेकीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सकाळीच शिवसेनेचे कार्यकर्ते मेट्रो ३ च्या बाहेर आंदोलन करत होते. या आंदोलनावेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी तिथं उभे असलेल्या डी.बी. रिअॅलिटी डेव्हलपर्सच्या गाड्या फोडल्या. त्यामुळं आता शिनसेनेने मेट्रो ३ विरोधात एल्गार पुकारल्याचं समोर आलं आहे.



हेही वाचा -

बाळासाहेबच NDA चे संस्थापक होते, राऊतांनी भाजपला सुनावलं

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर? 'हे' असू शकतं कारण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा