Advertisement

१५ आॅगस्टपर्यंत निकाल तर, नवं शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून - उदय सामंत

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार १ सप्टेंबर २०२० पासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील, असं आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी तसंच पालकांना दिलं.

१५ आॅगस्टपर्यंत निकाल तर, नवं शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून - उदय सामंत
SHARES

मुंबई विद्यापीठासहित इतर विद्यापीठांच्या सर्व परीक्षांचे निकाल १५ आॅगस्ट पर्यंत लावून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार १ सप्टेंबर २०२० पासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील, असं आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी तसंच पालकांना दिलं. 

राज्यातील विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी उदय सामंत यांनी शुक्रवारी दुपारी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी साधला संवाद. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होणार नाही याची राज्य सरकार पूर्ण दक्षता घेणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.

फायनल एक्झाम द्यावी लागेल

चालू शैक्षणिक वर्षाच्या रखडलेल्या परीक्षांविषयी बोलताना उदय सामंत म्हणाले, ज्या अभ्यासक्रमाच्या वार्षिक परीक्षा होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील. त्यानुसार २ वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल. स्वायत्त विद्यापीठांनीही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्यात. त्यानुसार ४ वर्षांचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची, तर ५ वर्षांचा कोर्स असणाऱ्यांना १० व्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल. 

हेही वाचा- फायनल इयर सोडून काॅलेजांच्या इतर परीक्षा रद्द- उदय सामंत

पुढच्या वर्षात प्रवेश पण..

या परीक्षांमध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला, तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल. पण, त्यांना नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या विषयीच्या वेळापत्रकाचे निर्णयही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येतील. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू, असेल असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा

लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये उपस्थित असल्याचं गृहित धरून त्यांची नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता जुलैच्या परीक्षा नजरेसमोर धरून अभ्यासावर व शैक्षणिक सत्रांवर लक्ष केंद्रित करावं. मात्र परीक्षा होणार नसलेल्या विद्यार्थ्यांनी सुट्टी आहे,अभ्यास नाही म्हणून घराबाहेर पडू नये. एसएनडीटी विद्यापीठाच्या राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील, इतर राज्यातील त्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार होतील, असं सामंत यांनी सांगितलं.

सुट्टीचा निर्णय

समितीच्या अहवालास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची सहमती आहे. उन्हाळी सुट्टीबाबत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा विचार करून प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीने विभागाचे काम सुरू आहे. त्यासाठी परीक्षांचे निकाल १५ ऑगस्टपर्यंत लावण्यात येतील, अशी माहिती सामंत यांनी दिली. शिवाय विद्यार्थी, पालकांच्या शंकाचे निरसन व समुपदेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापणार.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा