अजित पवारांनी घेतली मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची भेट

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

SHARE

पदव्युत्तर वैद्यकीय  प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात सापडलं आहे. या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.


विद्यार्थ्यांना फटका

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची भेट घेत राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असून देखील असं होणंहे सरकारचं अपयश आहेसरकारच्या चुकीच्या धोरणामुळंच या विद्यार्थ्यांना फटका बसला आहेमग हे फडणवीस सरकार कीफसणवीस सरकार हा या विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकीचा ठरतो काअसं यावेळी अजित पवार यांनी म्हटलंत्याशिवायया मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारत्यासाठी आजच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची भेट घेणार असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिलं.


आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहेयंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाहीअसा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला होतायाच निर्णयावरून मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे.हेही वाचा -

डिलाईल पुलाखाली मंडईतील गाळे तोडले, रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा

बकऱ्याच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघांना अटकसंबंधित विषय