Advertisement

डिलाईल पुलाखाली मंडईतील गाळे तोडले, रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परेल रेल्वे स्थानकावरील डिलाईल पुलाखालील खामकर मंडईतील १७२ व्यावसायिक गाळे पालिकेच्या जी दक्षिण विभागातर्फे शुक्रवारी तोडण्यात आले आहेत. त्यामुळं या पूलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिलाईल पुलाखाली मंडईतील गाळे तोडले, रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ रेल्वे स्थानकावरील डिलाईल पुलाचा रेल्वे मार्गावरील भाग पाडण्यात आला होता. मात्र या पुलाखाली असलेल्या मंडईमुळं पुलाचा पुनर्बांधणीचा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु या पुलाखालील खामकर मंडईतील १७२ व्यावसायिक गाळे महापालिकेच्या जी दक्षिण विभागातर्फे शुक्रवारी तोडण्यात आले आहेत. त्यामुळं या पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.


गाळे जमीनदोस्त

डिलाईल पुलाखाली पूर्वेकडं १६ झोपडीधारक होते. तसंच, पश्चिमेकडं खामकर मंडईतील १७२ गाळेधारक होते. यांनी या पुलाच्या तोडकामासाठी विरोध केल्यामुळं पूल पाडण्याचं काम काही काळ रखडलं होतं. मात्र, महापालिका प्रशासनानं शुक्रवारी गाळे रिकामे करून जमीनदोस्त केले असून रेल्वे प्रशासनानं आता हा संपूर्ण परिसर बॅरिकेड्स लावून बंद केला आहे. याचा गाळेधारकांनी तीव्र विरोध केला.


त्रिशूळ इमारतीत जागा

या पुलाखालील जागा गाळेधारक सोडत नसल्यानं पुलाचं काम रखडलं होतं. मात्र, गाळे तोडल्यामुळं या पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याशिवाय, सोमवारपासून या पुलाचा उताराचा भागही तोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं, गाळेधारकांना सीताराम जाधव मार्ग आणि गणपतराव कदम मार्गाच्या मध्यभागी असलेल्या त्रिशूळ इमारतीत जागा देण्याचं तसंच, सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.हेही वाचा -

दादर स्थानकातील पादचारी पूल दरूस्तीसाठी बंद

मुंबईत शाळेचे डबे पोचवणाऱ्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा