Advertisement

मराठी भाषा दिन : साने गुरुजी शाळेत विशेष प्रदर्शन

दादरमधील शिवाजीपार्क येथील साने गुरूजी शाळेमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

SHARES

मुंबईसह राज्यभरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व विविध संस्थांमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून, दादरमधील शिवाजीपार्क येथील साने गुरूजी शाळेमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र संस्कृतीचं प्रदर्शन यावेळी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी भरविण्यात आलं आहे.

या शाळेच्या प्रदर्शानाला मुख्य अतिथी म्हणून मनसे नेते नितिन सरदेसाई यांनी उपस्थिती दर्शवली होती. तसंच, सामाजिक कार्यकर्ते कमलाक्ष महाले व शाम सोपारकर उपस्थित होते. या प्रदर्शनात मराठी भाषेचा इतिहास सांगणारे किल्ले, भातुकली, सण, वेशभूषा, खाद्यपदार्थ, दागिने, पारंपारिक खेळ, कापडी बाहुल्या, यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीहा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या सर्व प्रदर्शनाला विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात लाभ घेतला आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केला. या दिनानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी शाळेपासून शिवाजी पार्कपर्यंत मिरवणूक काढून मराठी भाषा दिनाच्या घोषणा देत शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र गीत व इतर गीतांचं प्रदर्शम केलं.



हेही वाचा -

मराठी भाषा दिन : एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम

मालमत्ता कर थकबाकीदारांच्या वस्तू पालिका जप्त करणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा