Advertisement

एमबीबीएस परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता या परीक्षा जूनमध्ये होणार असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

एमबीबीएस परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात
SHARES

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे  एमबीबीएसच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांच्या परीक्षा जून महिन्यात होणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता या परीक्षा जूनमध्ये होणार असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर येणंजाणं किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलणं शक्य असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला, असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

याआधी १५  एप्रिलला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९  एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.’असे देशमुख यांनी सांगितलं होतं. या परीक्षा पुढे ढकलणेबाबत बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली होती.

दरम्यान, राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जण कोरोना संसर्गाने ग्रासले आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच १९ एप्रिलला सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.



हेही वाचा -

सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट, ७१ हजार बरे

लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा