Advertisement

MPSC विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ट्रेननं प्रवास करण्याची मुभा?

राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसंच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना हे पत्र लिहिलं आहे.

MPSC विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ट्रेननं प्रवास करण्याची मुभा?
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षार्थी तसंच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ३० आणि ३१ ऑक्टोबरला लोकल रेल्वेनं  प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असं पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला दिलं आहे.

राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसंच पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात, परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) च्या परीक्षेसाठी प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसंच परीक्षेसाठी लोकल रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी द्यावी.

त्याचप्रमाणे ‘एम एस इनोव्हेटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ हेही एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडित असल्यानं त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरिता प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे.

तसंच गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसंच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.



हेही वाचा

NEET परीक्षेचा निकाल जाहीर होणार, सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील

१८ वर्षांहून कमी वयाच्या विद्यार्थ्यांनी 'असा' मिळवा लोकलचा पास

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा