Advertisement

२ जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

MPSC परीक्षेसंदर्भात पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

२ जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली
SHARES

MPSC परीक्षेसंदर्भात पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २ जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षांची नवी तारीख लवकरच घोषित होणार आहे.

वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनामुळे याआधीही अनेकदा परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत, राज्यात सध्या ओमिक्रॉनचा वेगान फैलाव होत आहे, त्यामुळे शिथिल झालेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात येत आहेत.

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे, अशातच वय वाढलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना संधी मिळावी, याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा लांबणीवर टाकताना, परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. कोरोना महामारीत शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली.

आता या उमेदवारांची शासकीय सेवेची दारंदेखील बंद झाली होती. पण राज्य सरकारनं यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता.

त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी एक आदेशही जारी करण्यात आला होता. त्यानंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगानं एक पत्रक जारी करत अर्ज केव्हा भरता येतील याबाबत माहिती दिली आहे.

१ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावतील वयोवर्यादा ओलांडलेल्यांना २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येऊ शकेल. या अर्जांसाठीचं ऑनलाईन शुल्क हे देखील ३१ डिसेंबरपर्यंत भरावं लागणार आहे. तर एसबीआयमध्ये चलनाद्वारे शुल्क भरायचं झाल्यास चलनाची प्रत १ जानेवारीपर्यंत घ्यावी लागेल. त्यानंतर ३ जानेवारीपर्यंत बँकेच्या वेळेत चलनाद्वारे शुल्क करण्यास मुदत देण्यात आली आहे.हेही वाचा

नियुक्ती न मिळालेल्या 'त्या' शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

नर्सरी ते इयत्ता १च्या प्रवेशासाठी किमान वयाचे निकष शिथिल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा