Advertisement

एमपीएससीची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व विभागीय केंद्रांवर होणार

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी उमेदवारांच्यावतीने चर्चा केली.

एमपीएससीची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व विभागीय केंद्रांवर होणार
SHARES

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरला होणारी परीक्षा फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी उमेदवारांच्यावतीने चर्चा केली. कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.

२० सप्टेंबर रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  



हेही वाचा

अक्षरांमध्ये अडखळणाऱ्या विद्यार्थ्याला दहावीत ९० टक्के गुण!

कर्करोगाशी झुंजत अमृतानं दहावीत मिळवले ८४ टक्के गुण!




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा