Advertisement

अक्षरांमध्ये अडखळणाऱ्या विद्यार्थ्याला दहावीत ९० टक्के गुण!

ख-याखु-या जीवनातही कधीकधी सिनेमासारख्या घटना घडतात. पण त्यासाठी चमत्कार नव्हे, तर सुयोग्य मार्गदर्शन कामी येतं. असाच एक प्रकार घडला आहे मुलुंडच्या क्रिश शिरीष शाहसोबत...

अक्षरांमध्ये अडखळणाऱ्या विद्यार्थ्याला दहावीत ९० टक्के गुण!
SHARES

ख-याखु-या जीवनातही कधीकधी सिनेमासारख्या घटना घडतात. पण त्यासाठी चमत्कार नव्हे, तर सुयोग्य मार्गदर्शन कामी येतं. असाच एक प्रकार घडला आहे मुलुंडच्या क्रिश शिरीष शाह या मुलासोबत. अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी- एकाग्रतेचा अभाव आणि अतिचंचलता समस्या) आणि बिहेव्हिअरल (वर्तवणूक समस्या) इश्यूजची समस्या होती.

यामुळे क्रिश जेव्हा पहिली-दुसरीत होता, तेव्हा त्याला अक्षरं समजत नव्हती. बोलताना तो अडखळायचा. पण आज तोच क्रिश आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांनी उत्तीर्ण झाला आहे. वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन पुढे त्याला एमबीए व्हायचं आहे.

मुलुंडच्या एनईएस नॅशनल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असलेल्या क्रिशचं वर्गात लक्ष नसायचं. वर्गमित्रांमध्ये मिसळणं त्याला जमत नव्हतं. अभ्यास तर दूरची गोष्ट. सुरुवातीला शिक्षकांनी दुर्लक्ष केलं, पण तिसरीत गेल्यावरही सुधारणा होत नाही, म्हणून शिक्षकांनी पालकांकडे तक्रार करायला सुरुवात केली. क्रिशची आई कोमल शाह यांनी चाइल्ड लर्निंग सेंटरचे संस्थापक डाॅ. सुमित शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि क्रिशला नियमित समुपदेशन, थेरपी सुरु केली.

पाचवी, सहावी, सातवी अशी तीन सलग वर्षं आॅक्युपेशनल थेरपिस्ट असलेल्या डाॅ. सुमित शिंदे यांनी अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसाॅर्डर आणि वर्तवणूक समस्यांच्या (बिहेव्हिअरल इश्यूज) संदर्भात क्रिशला समुपदेशन केलं. "क्रिश आठवीत येईपर्यंत त्याची वर्तवणूक समस्या दूर झाली.

हळूहळू तो वर्गमित्रांमध्ये मिसळू लागला. त्याची शैक्षणिक कामगिरी सुधारली. ज्या विषयात उत्तीर्ण व्हायला त्याला अडचण यायची, त्या गणितासारख्या विषयात तो चांगले गुण मिळवू लागला. शाळेतील शिक्षकांनीही त्याच्यावर विशेष मेहनत घेतली" अशी माहिती कोमल शाह यांनी दिली. नुकत्याच लागलेल्या आयसीएससई दहावीच्या निकालात क्रिशला ९० टक्के गुण मिळाले, तेव्हा त्याच्या पालकांचा आणि शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

वर्तवणूक समस्या तसंच अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसाॅर्डरमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकले जातात. याविषयी सांगताना 'चाइल्ड लर्निंग सेंटर'चे डाॅ. सुमित शिंदे म्हणाले, "कोणत्याही प्रकारच्या डेव्हलपमेंटल इश्यूजमुळे किंवा लर्निंग डिसॅबिलिटीमुळे जर मुलांना अडचणी येत असतील, तर पालकांनी त्या वेळीच ओळखायला हव्यात.

लहान वयातच अशा मुलांना जर योग्य समुपदेशन, मार्गदर्शन आणि उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आणि पालकांनीही जर मुलांकडे विशेष लक्ष दिलं, तर वर्तवणूक समस्याग्रस्त मुलंही इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात."



हेही वाचा

कर्करोगाशी झुंजत अमृतानं दहावीत मिळवले ८४ टक्के गुण!

मेहनतीला मिळालं यश, दहावी परीक्षेत मिळाले ९९.६० टक्के

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा