Advertisement

'या' दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिका

पुढच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रिकांच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

'या' दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिका
SHARES

काही दिवसांपूर्वीच दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला. निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. तरीही पुढच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रिकांच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे यंदा घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रिकांच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येवू नयेत म्हणून मंडळाकडून १५ ऑगस्टपूर्वी गुणपत्रिका जिल्हानिहाय वितरीत करण्याचे नियोजन विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहेत.

तूर्तास विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यानंतर कॉलेज, अभ्यासक्रम आणि पसंतीक्रम भरले जात आहेत. मात्र, प्रवेश निश्‍चितीसाठी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार गुणपत्रिकांसह अन्य कागदपत्रे जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यादृष्टीनं बोर्डाकडून नियोजन करण्यात येत आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी गुणपत्रिका वेळेत मिळाव्यात या हेतूनं युद्धपातळीवर काम सुरू आहे. येत्या ८ दिवसांत संबंधित महाविद्यालयांना गुणपत्रिका पोच केल्या जाणार असल्याचं विभागीय बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.


हेही वाचा

मेहनतीला मिळालं यश, दहावी परीक्षेत मिळाले ९९.६० टक्के

Medical Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप नाहीच, राज्य सरकार मांडणार बाजू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा