Advertisement

MPSC च्या मुख्य परीक्षा 'या'दिवशी होणार

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० ची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

MPSC च्या मुख्य परीक्षा 'या'दिवशी होणार
SHARES

MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेचं आयोजन येत्या ४ डिसेंबरला केलं जाईल.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० ची तारीख जाहीर जाहीर करण्यात आली आहे. येत्या ४ डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाईल. या मुख्य परीक्षेसोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन येत्या १८ डिसेंबर रोजी केलं जाईल. मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्याची मागणी आयोगाकडे विद्यार्थी करत होते. एमपीएससी आयोगानं या तारखा जाहीर केल्या आहेत.

याबाबत आयोगाकडून काढण्याता आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२०, दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत एमपीएससी आयोगानं या परीक्षांबाबत स्वतंत्र परिपत्रक काढलं.

तसंच या परिपत्रकाद्वारे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० तसंच अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा यांच्या तारखा जाहीर केल्या. या परीक्षा राज्यात एकूण ६ केंद्रावर आयोजित केल्या जाणार आहेत. औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर ,नाशिक, पुणे या जिल्ह्यांतील केंद्रावर या परीक्षांचे आयोजन केलं जाणार आहे.हेही वाचा

मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा : आदित्य ठाकरे

CET परीक्षांच्या तारखा जाहीर, 'या' कालावधीत होणार परीक्षा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा