Advertisement

विद्यापीठाचे निकाल यावर्षीही उशिरानेच?


विद्यापीठाचे निकाल यावर्षीही उशिरानेच?
SHARES

उत्तरपत्रिकांची ऑनलाईन तपासणी होणार अशी घोषणा मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केली आहे. मात्र अद्याप ऑनलाईन असेसमेंटच्या प्रक्रियेला मुहूर्त सापडलेला नाही. मुंबई विद्यापिठाच्या एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांच्या उतरपत्रिका तपासणीला अजून सुरुवात झालेली नाही. शनिवारी निविदा प्रक्रिया पूर्ण होणार होती. मात्र केवळ तीनच कंपन्यांनी सहभाग घेतल्यामुळे या प्रक्रियेसाठी 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

उत्तरपत्रिका तपासणीमध्ये वेळ वाया जातो. त्यामुळे निकाल उशीरा लागतो. हा वेळ वाया जाऊ नये म्हणून कुलगुरूंनी उत्तरपत्रिकांची ऑनलाईन तपासणीची घोषणा केली. त्यानुसार प्रक्रियाही सुरू झाली. पहिल्यांदा केवळ दोनच कंपन्यानी सहभाग घेतल्यामुळे या प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन तपासणीसाठी जास्त खर्च येणार म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून फी वाढ करण्याचा निर्णय विद्यापिठाने घेतला आहे.

परीक्षेच्या याच तपासणी प्रक्रियेमुळे विद्यापीठाने फी वाढवण्याचा निर्णयही घेतला होता.

https://www.mumbailive.com/mr/education/mumbai-universitys-online-assessment-results-in-fees-hike-10558

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा