Advertisement

विद्यापीठाचे पहिले पाढे पंचावन्न! ही डेडलाईनही चुकलीच


विद्यापीठाचे पहिले पाढे पंचावन्न! ही डेडलाईनही चुकलीच
SHARES

न्यायालयाची डेडलाईन पाळण्यासाठी पुन्हा एकदा विद्यापीठ असमर्थ ठरले आहे. लॉचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावण्यासाठी न्यायालायने ४ नोव्हेंबर ही तारीख दिली होती. मात्र, न्यायालयाने दिलेली तारीख पाळण्यात पुन्हा एकदा विद्यापीठ सगळ्यांचे निकाल लावण्यात नापास झाले आहे.

ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयामुळे लॉच्या विद्यार्थ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. उशीरा लागलेल्या निकालांमुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अडचण निर्माण झाली. अखेर विद्यार्थ्यांनी न्यायालयाची दारं ठोठावली. त्यावेळी न्यायालयाने त्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल प्रवेश देण्याची सूचना विद्यापीठाला केली.


न्यायालयाची डेडलाईन न पाळणे हे विद्यापीठाचे नेहमीचेच झाले आहे. विद्यापीठाने अद्याप विद्यार्थ्यांची ताकद ओळखलेली नाही. येत्या दोन दिवसांत आम्ही मोठे आंदोलन छेडणार आहोत. त्यानंतर विद्यापीठाला आमची खरी ताकद कळेल.

सचिन पवार, अध्यक्ष स्टुडंट लॉ कौन्सिल


न्यायालयाचा आदेश पाळला नाही....

३ नोव्हेंबरला झालेल्या सुनवणीत न्यायालयाने '४ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत लॉच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावा', असे आदेश विद्यापीठाला दिले होते. ४ तारखेला गुरूनानक जयंती असल्यामुळे विद्यापीठाला सुट्टी होती. त्यामुळे निकाल लावणे कठीण होते. मात्र तरीही विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावावेत, असे आदेश न्यायालयाने दिले. मात्र न्यायालयाचे आदेश पाळण्यात विद्यापीठ पुन्हा एकदा नापास झालंय. विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. फक्त काही विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात विदयापीठाला यश आले आहे.


न्यायालयाने सांगितलेली डेडलाईन विद्यापीठाने पाळली नाही. दोन महिन्यांपूर्वी आम्ही पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. अद्याप आम्हाला निकाल मिळाला नाही. आमचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे.

राहुल ठाकूर, याचिकाकर्ता


प्रवेश नाहीच.…

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर विद्यापीठाने केवळ त्या विद्यार्थ्यांचे अर्ज दखल करून घेतले. मात्र, अद्याप त्यांना अॅडमिशन देण्यात आलेले नाही. त्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांना अॅडमिशन देता येणार नाहीये.



हेही वाचा

द्वितीय सत्रातील परीक्षांसाठी विद्यापीठाचा मास्टर प्लॅन तयार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा