सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई ८१ व्या स्थानी

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं (एचआरडी) उच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी घोषित केली आहे. तसंच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था, सर्वोतृष्ट विद्यापीठं आणि सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.

SHARE

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं (एचआरडी) उच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी नुकतीच घाेषित केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था, सर्वोतृष्ट विद्यापीठं आणि सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यामधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला १०वं स्थान मिळालं आहे. परंतु, या यादीत मुंबई विद्यापीठाला पहिल्या १०० मध्ये देखील स्थान मिळालं नाही आहे.


मुंबई विद्यापीठ ८१ व्या स्थानी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जाहीर केलेल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला ९वं स्थान मिळालं आहे, तर मुंबई विद्यापीठ ८१ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. त्याशिवाय, सर्वोकृष्ट विद्यापीठांच्या यादीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरुने पहिला क्रमांक पटकावला आहे. तसंच, टॉप १० विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील फक्त पुणे विद्यापीठाला स्थान मिळवता आलं आहे.


आयआयटी बॉम्बे तिसऱ्या क्रमांकावर

दरम्यान, सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत आयआयटी मद्रासनं पहिल्या स्थानी आहे. तर, आयआयटी बॉम्बे या महाराष्ट्रातल्या एकमेव अभियांत्रिकी संस्थेला या यादीत स्थान मिळालं असून, तिसरा क्रमांक मिळाला आहे. ही क्रमवारीचा अहवाल सादर करण्यासाठी तसंच, ही क्रमवारी ठरवण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्कनं (एनआयआरएफ) संपूर्ण भारतातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय, मॅनेजमेंट, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर आणि विधी महाविद्यालयांचा अभ्यास केला होता.हेही वाचा -

उर्मिला मातोंडकरकडे ६९ कोटींची संपत्ती, इतर उमेदवारांच्या संपत्तीत 'इतकी' झाली वाढ

'सलमान सोसायटी'च्या शेवटच्या सत्राला सुरुवातसंबंधित विषय