Advertisement

परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, आयडॉलच्या परीक्षा पुढे

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, आयडॉलच्या परीक्षा पुढे
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅकनं तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानं ६ व ७  ऑक्टोबर रोजी होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवल्या जाणार आहेत. तसंच,  त्या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जाणार आहेत. ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक आढळला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ तक्रार नोंदविणार आहे. यामुळे या परीक्षांमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेस ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. मंगळवारी या परीक्षेचा दुसरा पेपर होता. तांत्रिक अडचणीमुळ हे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच बुधवारी ७ ऑक्टोबररोजी होणाऱ्या परीक्षा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र ६ व बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, एमसीए सत्र १ व सत्र २ या परीक्षाचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय