Advertisement

मुंबई विद्यापीठामार्फत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेऊन देशासह जगात नावलौकिक करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विद्यापीठामार्फत यथोचित सन्मान केला जाणार आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान
SHARES

देशासह जगात मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेऊन नावलौकिक करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठामार्फत सन्मान करण्यात येणार आहेया माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची सर्वांना ओळख पटवून देण्यासाठी आणि  त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी हा पूरस्कार देण्यता येणार आहे.  

३ माजी विद्यार्थ्यी

यंदाच्या वर्षीपासून  विद्यापीठामार्फत डायमंड ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई हे पुरस्कार दिले जाणार आहेत. विद्यापीठातर्फे आयोजित होणाऱ्या विशेष कार्यक्रमात दरवर्षी ३ माजी विद्यार्थ्यांना सन्मानित केलं जाणार आहेनुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कामगिरी सर्वोत्तम

क्यूएस ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी रँकिंगनुसार मुंबई विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांची कामगिरी सर्वोत्तम असल्याचं पाहणीत उघड झालं आहे. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद घेत १०० पैकी ८७.२ एवढे गुण विद्यापीठाला बहाल करण्यात आले आहेत.


महत्त्वाचं योगदान

मुंबई विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. समृद्ध राष्ट्राच्या उभारणीत या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असून, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार समजल्या जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारानं या विद्यापीठातील ५ माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं आहेपद्मश्री, पद्मभूषण अशा विविध पुरस्कारांनी या विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आलं आहे. रॉयल फेलो ऑफ सोसायटी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही या विद्यार्थ्यांनी खूप मोठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर आचारसंहितेचं सावट

मुंबईत पावसाची विश्रांती, उन्हाचा ताप वाढला
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा