Advertisement

निवडणुकीमुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

लोकसभा निवडणुकीमुळे अनेक परीक्षांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने विद्यापीठाने निवडणुकीच्या कालावधीत येणारे पाच पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणुकीमुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
SHARES

साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. यानुसार राज्यात येत्या ११ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरूवात होणार असून राज्यात ४ टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने काही परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयामुळे अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 


निवडणुका जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत १७ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. यानुसार लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान ७ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहे. यात मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात दोन टप्प्यात निवडणुका होत असून पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे या जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत. तर २९ एप्रिल ला मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड (मावळ) व सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होत आहेत.


वेळापत्रक वेबसाईटवर

या निवडणुकीदरम्यान म्हणजेच २२, २३ व २४ एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठाच्या काही परीक्षांचे पेपर आयोजित करण्यात आले होते. त्याशिवाय  दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २९ व ३० एप्रिल २०१९ रोजी दोन पेपरचं आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीमुळे अनेक परीक्षांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने विद्यापीठाने निवडणुकीच्या कालावधीत येणारे ५ पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यपीठाने पुढे ढकललेल्या परीक्षांमध्ये प्रामुख्याने आर्ट्स आणि कॉमर्स शाखेचा समावेश असून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. 


दुसऱ्या दिवशीही सुट्टी

त्याशिवाय निवडणुकीच्या कामासाठी विद्यापीठातंर्गत येणारी अनेक कॉलेज निवडणुकीची केंद्र असतात. ही केंद्र निवडणुकीच्या एक दिवस आधीच निवडणुक आयोगाद्वारे ताब्यात घेण्यात येत असतात. तसेच अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निवडणुकीच्या कामात सक्रीय असल्याने दुसऱ्या दिवशी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास शिक्षकांना उशीर होतो. त्यामुळे परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ व ३० एप्रिल २०१९ या दोन्ही दिवशी पेपर न ठेवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. 



हेही वाचा -

मतदानासाठी यंदा प्रथमच 'व्हीव्हीपॅट'चा वापर

'असं' होणार महाराष्ट्रात मतदान



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा