Advertisement

विद्यार्थ्यांना मिळणार आता डिजिटल प्रमाणपत्र


विद्यार्थ्यांना मिळणार आता डिजिटल प्रमाणपत्र
SHARES

सध्याच्या डिजिटल युगात शैक्षणिक क्षेत्रामध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, ई-बुक्सची चलती असताना प्रमाणपत्र तरी कागदावर छापून का मिळावे, असा प्रश्न कुणालाही सहज पडू शकेल. ऑनलाइन अॅडमिशनपासून नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करताना प्रत्येकालाच प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करावी लागतात.

हा त्रास वाचवण्यासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपातच उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार आता पदवी प्रमाणपत्रांपासून ते शालेय शैक्षणिक प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना डिजिटल रूपात मिळणार आहेत.


विद्यार्थ्यांचे डिजिटल खाते

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी (एनएडी) हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत नॅशनल 'सिक्युरीटी डिपॉझिटरी लिमिटेड' डिजिटल प्रमाणपत्रांची प्रक्रिया राबवणार आहे. मुंबई विद्यापीठाने 'एनएडी'बरोबर विशेष करार केला असून त्याअंतर्गत मुंबई विद्यापीठाशी संलग्न विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणमत्र मिळतील.

दिल्लीतील विज्ञान भवनात 'उच्च शिक्षणातील डिजिटल पुढाकार' या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 'राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी‘ची स्थपना करण्यात आली. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावे डिजिटल खाते सुरू करण्यात येणार आहे.


आधार कार्डाशी लिंक

या खात्यात विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात जमा केली जाणार आहेत. या खात्याला आधार कार्ड लिंक केले जाईल. त्यामुळे बनावट प्रमाणपत्रांना चाप बसेल. तसेच भविष्यात शिक्षण संस्था आणि नोकरीच्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्रांची पडताळणी करता येणे शक्य होणार आहे.


याबाबत एनएसडीबरोबर मुंबई विद्यापीठाने विशेष करार केला आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. भविष्यात संपूर्ण शिक्षण क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्रांची पडताळणी करणेही सहज शक्य होईल.
- डॉ. संजय देशमुख, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



हे देखील वाचा -

मुंबई विद्यापीठ करतंय तरी काय? २१० परीक्षांचे निकाल रखडले!

घोकंपट्टी बंद होणार..तोंडी परीक्षाच रद्द!



 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा