Advertisement

विद्यार्थ्यांनो काळजी नको, सरासरी गुण मिळणार!


विद्यार्थ्यांनो काळजी नको, सरासरी गुण मिळणार!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे कित्येक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं होतं. पण आता या प्रकरणी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत त्यांचे निकाल जाहीर करणार असल्याची ग्वाही मुंबई विद्यापीठाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. विधी शाखेच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या तीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तर पत्रिका गहाळ झाल्याचं समोर येताच उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


त्या विद्यार्थ्यांना अखेर न्याय

विधी शाखेच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या आदित्य शिकरे, योगिता भालोथिया आणि मोईनुद्दीन चौधरी हे तिघे विद्यार्थी नापास झाले होते. या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या फोटो कॉपीसाठी विद्यापीठात अर्ज केला असता त्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचं समजलं. त्यामुळे या तीन विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


सुनावणी काय झालं?

या प्रकरणी मंगळवारी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. त्यावर विद्यापीठाने गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकेमुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढले असून त्यात अशा विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत त्यांचे निकाल जाहीर करण्यात येतील, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. त्यावर समाधान व्यक्त करत न्यायालयाने याचिका निकाली काढली.


हेही वाचा - 

सरासरी गुणांचा विचार नाहीच - मुंबई विद्यापीठ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा