Advertisement

लॉचे रखडलेले निकाल १० दिवसात


लॉचे रखडलेले निकाल १० दिवसात
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेचा रखडलेला निकाल आगामी दहा दिवसात जाहीर करण्यात येतील असे आश्वासन प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिले आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधी शाखेच्या परीक्षांमधील तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्याने हे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

पुढील परीक्षा तोंडावर आली तरी विद्यापीठ काहीच निर्णय घेत नसल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धडक देत ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. याची दखल घेत विद्यापीठाने नुकतेच रखडलेल्या निकालांच्या कामासाठी वकिलांची मदत घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.


'विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी द्या'

मुंबई विद्यापीठात नोव्हेंबरमध्ये तीन वर्षे लॉ अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर एक, दोन आणि तीनच्या परीक्षा झाल्या, मात्र या परीक्षांचे निकाल अजूनही जाहीर झाले नाहीत. त्याचप्रमाणे के टीच्या सेमिस्टर २, ४ आणि ६ चे निकालही जाहीर करण्यात आलेले नाहीत. मग हे विद्यार्थी पुढील परीक्षा कशी देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्यानंतर कमीत कमी ३५ तर जास्तीत जास्त ४५ दिवसांत निकाल जाहीर होणे बंधनकारक आहे. पण आता परीक्षा होऊन १०० दिवस झाले तरी निकाल जाहीर झालेले नाहीत. हे निकाल तातडीने जाहीर करावेत, विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


वकिलांची पेपर तपासणीसाठी मदत

पेपर तपासणीच्या कामासाठी प्राध्यापक मिळत नसल्याची तक्रार समोर आली असून, त्यावर उपाय म्हणून बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या ज्या वकिलांना ५ वर्षांचा अनुभव आहे, अशा व्यक्तींची पेपर तपासणीच्या कामासाठी मदत घेण्याबाबत विचार विद्यापीठाद्वारे करण्यात येत आहे. गेल्यावर्षी निकालाचा गोंधळ समोर आल्यानंतर त्यावेळीही अशा प्रकारची मदत घेण्यात आली होती. त्याच धर्तीवर यंदाही हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.


हेही वाचा - 

'लॉ'चे हजारो विद्यार्थी वेटिंगवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा