मुंबई विद्यापीठ देणार १९ नव्या महाविद्यालयांना मान्यता


SHARE

पदवी कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मुंबई विद्यापीठ एकूण १९ कॉलेजला मान्यता देण्याच निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयानंतर आता मुंबईतील कॉलेजांच्या संख्येत वाढ होणार आहे. या नव्या कॉलेजमध्ये २ महिला कॉलेज, ३ नाईट कॉलेज आणि ४ लॉ कॉलेजांचा समावेश आहे. 

एकूण ८१२ कॉलेज

सध्यस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत ७९३ कॉलेज आहेत. मात्र, मुंबई विद्यापीठानं १९ कॉलेजला मान्यता दिल्यानंतर  एकूण कॉलेजची संख्या ८१२ होणार आहे. नवीन कॉलेज हे दादर, भांडुप, विक्रोळी, अंधेरी, विलेपार्ले, जुहू आणि डोंबिवली या भागात सुरू होणार आहेत. 

उच्च शिक्षण विभागाची मंजूरी

उच्च शिक्षण विभागानं महानगरासह महाड आणि दापोली या ठिकाणीही कॉलेज सुरू करण्यास मंजूरी दिली आहे. महाड आणि दापोलीमध्ये महिला कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, दादर(प.), विक्रोळी आणि अंधेरी या परिसरात नाईटकॉलेज सुरू करण्यात येणार आहे. तसंच, भांडुप किंवा विक्रोळी भागात स्किल डेव्हलपमेंटवर आधारित एक कॉलेज सुरू करण्यात येणार आहे.हेही वाचा -

महापौरांनी विनयभंग केलाच नाही, 'त्या' महिलेने केला खुलासा!

२ दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पूरग्रस्तांसाठी जमले २० कोटीसंबंधित विषय
ताज्या बातम्या