Advertisement

नवी मुंबईत 'ह्या' आहेत अनधिकृत शाळा, पालिकेकडून यादी जाहीर

राज्य शासनाची तसंच नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईत 'ह्या' आहेत अनधिकृत शाळा, पालिकेकडून यादी जाहीर
SHARES

नवी मुंबई महापालिकेने अनधिकृत पालिका क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर केली आहे. राज्य शासनाची तसंच नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.  या शाळांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या पालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खासगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगी शिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी, असे आदेश नवी मुंबई महापालिकेने दिले आहेत.

या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत आणि ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजीकच्या शासन मान्य शाळेत प्रवेश घ्यावा, असं आवाहनही पालिकेने पालकांना केलं आहे. 

पालिकेने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळा

  • इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेचे अल मोमिना स्कुल, सी.बी.डी. बेलापूर इंग्रजी माध्यम
  • ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, अग्रीपाडा, मुंबई या संस्थचे इकरा इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ इंग्रजी माध्यम
  • द आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी, सीवूड, सेक्टर-40, नेरूळ, इंग्रजी माध्यम
  • वर्ल्ड एज्युकेशनल ट्रस्टचे तुर्भे स्टोअर्स येथील नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कूल
  • उज्वला फाऊंडेशन, वाशी यांचे रोज बड्स स्कूल, तुर्भेस्टोअर्स, नवी मुंबई;
  • ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ, किसान न. 3 ठाणे या संस्थेचे घणसोली सेक्टर 5 येथील इंग्रजी माध्यमाचे सरस्वती विद्यानिकेतन स्कूल,
  • गॅलरी एज्युकेशन ऍण्ड व्हेल्फेर सोसायटी संस्थेचे घणसाली सेक्टर 1 येथील अचिएवर्स वर्ल्ड प्रायमरी स्कूल
  • अल मेझान एज्युकेन सोसायटी या संस्थेचे घणसोली सेक्टर 2 येथल इम्पाईसीस इंग्रजी स्कूल
  • अविनाश विद्या केंद्र ट्रस्ट संस्थेचे घणसोली गाव येथील इंग्रजी माध्यमचे ब्लोसोम स्कूल
  • रबाळे आंबेडकर नगर येथील इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट, ऐरोली यांचे इलिम इंग्लिश स्कूल

हेही वाचा -

वाशीमध्ये विशेष कोविड रुग्णालय सुरू, 'इतक्या' खाटांची असेल व्यवस्था

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा