Advertisement

NEET PG 2021 परीक्षाही पुढे ढकलली

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. कोरोनाची परिस्थिती पाहून या परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा केली जाईल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

NEET PG 2021 परीक्षाही पुढे ढकलली
SHARES

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १८ एप्रिल रोजी घेण्यात येणारी नीट पीजी (NEET-PG) ची परीक्षा पुढे ढकलण्याचा  निर्णय घेतला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. कोरोनाची परिस्थिती पाहून या परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा केली जाईल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. 

नुकतंच केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता नीट पीजी परीक्षा स्थगीत करण्यात आली आहे. यंदा नीट परीक्षेत १.७ लाख विद्यार्थी सामील होणार होते. या परीक्षेच्या माध्यमातून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयांमध्ये दाखल केलं जातं.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट केलं आहे की, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्या कारणाने भारत सरकारने #NEETPG2021 परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. परीक्षेची पुढील तारीख कालांतराने ठरविण्यात येईल. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. 



हेही वाचा -

नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा- मुख्यमंत्री

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा