'रात्र शाळांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषण करू'

  Mumbai
  'रात्र शाळांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषण करू'
  मुंबई  -  

  रात्रशाळांबाबत 15 जूनपर्यंत निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषण करू, असा इशारा आमदार कपिल पाटील यांनी दिला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय 17 मे रोजी घेण्यात आला होता. तो निर्णय त्वरीत रद्द व्हावा, अशी मागणी शिक्षक भारती आणि महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती.

  जूनपासून रात्रशाळा सुरू होऊ नयेत, कष्टकरी विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद व्हावे, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
  अशोक बेलसरे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष

  रात्रशाळा बंद करण्याच्या या निर्णयामुळे रात्र शाळेतील 1,010 शिक्षक आणि 348 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. यानंतर रात्रशाळेच्या शिक्षकांनी शिक्षण मंत्र्यांची भेट देखील घेतली होती. मात्र या भेटीनंतरही काहीच फायदा न झाल्यामुळे आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.


  हेही वाचा -

  रात्रशाळेतील 1010 शिक्षकांना काढण्याचा सरकारचा घाट


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.